मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shubman Gill - Sara Tendulkar : शुबमन गिल – सारा तेंडुलकरच्या नात्याविषयी ‘या’ क्रिकेटरकडून मोठा खुलासा

Shubman Gill - Sara Tendulkar : शुबमन गिल – सारा तेंडुलकरच्या नात्याविषयी ‘या’ क्रिकेटरकडून मोठा खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 18, 2023, 12:43 PM IST

    • Shubman Gill - Sara Tendulkar Relationship: सारा आणि शुबमन गेल्या काही दिवसांपालून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता यावर एका क्रिकेटपटूने वक्तव्य केले आहे.
shubman gill life story

Shubman Gill - Sara Tendulkar Relationship: सारा आणि शुबमन गेल्या काही दिवसांपालून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता यावर एका क्रिकेटपटूने वक्तव्य केले आहे.

    • Shubman Gill - Sara Tendulkar Relationship: सारा आणि शुबमन गेल्या काही दिवसांपालून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता यावर एका क्रिकेटपटूने वक्तव्य केले आहे.

भारतीय संघातील क्रिकेटपटू शुभमन गिल हा सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या खेळामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून शुभमनचे नाव हे सारा तेंडुलकरशी जोडले जात होते. अभिनेत्री सारा अली खानने 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तुम्ही चुकीच्या साराच्या मागे लागले आहात असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर आता सोशल मीडियावर एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो सारा आणि शुभमन विषयी बोलताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

सोशल मीडियावर क्रिकेटपटू चिराग सूरीचा एक जूना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चिराग सारा आणि शुभमन यांच्या नात्याविषयी बोलताना दिसत आहे. ‘शुभमन गिल याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारण्यात आले..’ तेव्हा चिराग सूरी म्हणाला, ‘शुभमन याची एक गर्लफ्रेंड आहे आणि तिचे नाव सारा आहे.. सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा…’
वाचा: तर सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चनचा सावत्र मुलगा असता? काय आहे प्रकरण जाणून घ्या

सध्या सोशल मीडियावर चिरागचा हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मुलाखतीनंतर शुभमन याने चिराग सूरी याला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले होते. सध्या सर्वत्र सारा आणि शुभमन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र शुभमन साराला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये शुभमनला आवडती अभिनेत्री कोणती? असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्याने सारा तेंडुलकर असे उत्तर दिले होते. त्यानंतर सारा अली खान आणि शुभमन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. कॉफी विथ करणच्या एपिसोडनंतर शुभमन सारा अली खान नाही तर सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचे स्पष्ट झाले.

पुढील बातम्या