बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ७०- ८०च्या दशकात त्यांनी अभिनयाच्या जोरावर अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले होते. आजही त्यांचा चाहता वर्ग सातासमु्द्रापार असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या अमिताभ हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर महानायक अमिताभ बच्चन यांचे सावत्र मुलगा असते अशी चर्चा सध्या रंगत आहे… तर रंगणाऱ्या चर्चांमागील नक्की सत्य काय आहे जाणून घेऊ.
२००० साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी गुरुकुलच्या मुख्यध्यापकांच्या भूमिकेला न्याय दिला. चित्रपटातील अमिताभ यांच्या भूमिकेचे नाव नारायण शंकर असे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या सावत्र मुलाच्या भूमिकेसाठी सचिन तेंडुलकर यांना साईन करण्यात आले होते. पण नंतर स्क्रिप्टमधून बिग बी यांच्या सावत्र मुलाची भूमिका काढून टाकण्यात आली. आदित्य चोप्रा यांनी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री श्रीदेवी यांना देखील विचारणा केली होती. बिग बी आणि श्रीदेवी यांची प्रेमकथा ‘मोहब्बतें’मध्ये दाखवण्यात येणार होती. पण श्रीदेवी यांनी भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर याच भूमिकेसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितला विचारण्यात आले होते.
वाचा: IND vs NZ सेमी फायनलचा भाईजानला बसला फटका, सलमान खानचे मोठे नुकसान!
‘मोहब्बतें’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन २३ वर्षे उलटली आहेत. मात्र आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. आदित्य चोप्राच्या या चित्रपटानू अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे उदय चोप्रा, जुगल हंसराज, झिम्मी शेरगिल, शमिता शेट्टी, किस शर्मा, प्रिती झंगियानी यांच्यासोबत अनेक कलाकारांच्या करियरला एक नवी दिशा मिळाली. चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या भूमिकेने तर सर्वांचे लक्ष वेधले होते.
संबंधित बातम्या