मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स!

Viral Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सुष्मिता सेनच्या भावाचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स!

Jan 07, 2023, 11:37 AM IST

    • Charu Asopa And Rajeev Sen Romantic Dance Video: राजीव सेन आणि चारू असोपा या दोघांनी कोलकाता येथे एका कौटुंबिक लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून सगळेच दंग झाले होते.
Charu Asopa And Rajeev Sen Romantic Dance Video

Charu Asopa And Rajeev Sen Romantic Dance Video: राजीव सेन आणि चारू असोपा या दोघांनी कोलकाता येथे एका कौटुंबिक लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून सगळेच दंग झाले होते.

    • Charu Asopa And Rajeev Sen Romantic Dance Video: राजीव सेन आणि चारू असोपा या दोघांनी कोलकाता येथे एका कौटुंबिक लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून सगळेच दंग झाले होते.

Charu Asopa And Rajeev Sen Romantic Dance Video: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा सध्या प्रचंड चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चारू आणि राजीव घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दोघांनीही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या सगळ्यादरम्यान ते अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट होत आहेत. या आधी देखील त्यांनी आपण पॅचअप अकर्त असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा घटस्फोटाची घोषणा केली होती. आता ते दोघे चक्क एका गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

राजीव सेन आणि चारू असोपा या दोघांनी कोलकाता येथे एका कौटुंबिक लग्न सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून सगळेच दंग झाले होते. या लग्नाच्या संगीत सोहळ्यात दोघांनी ‘पहला पहला प्यार है’ या गाण्यावर रोमँटिक डान्स केला. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून नाचताना दिसले. यावेळी राजीवने चारूला उचलून स्टेजवरून नेले. इतकेच नाही तर, दोघेही एकमेकांचा हात पकडून या लग्न समारंभात वावरताना दिसले. यावेळी त्यांची मुलगी जियाना देखील त्यांच्यासोबत होती. दोघांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दोघांचा हा रोमँटिक डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर दोघांचे चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेक चाहते म्हणत आहेत की, तुम्ही दोघे असेच एकत्र राहा. जियाना देखील तुमच्यासोबत आनंद दिसत आहे. तर, काही चाहते म्हणत आहेत की, ‘सतत घटस्फोट घेण्याचा विचार मनात येऊ देऊ नका. मुलीचा विचार करा आणि एकत्र या. तुमची जोडी खूप छान आहे.’

या आधी राजीव आणि चारूने एकमेकांवर अतिशय गंभीर आरोप केले होते. चारूने राजीववर मारहाण आणि संशय घेतल्याचा आरोप केला होता. तर, राजीव सेनने पत्नी चारूचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले होते. मात्र, यानंतर त्यांनी आपल्या मुलीचा विचारून करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.

विभाग

पुढील बातम्या