मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ ओटीटीवर रिलीज; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

Brahmastra : रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ ओटीटीवर रिलीज; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

Nov 04, 2022, 01:52 PM IST

  • Brahmastra On OTT : शक्तिशाली शस्त्रास्त्रांची ताकद दाखवणारा ‘ब्रह्मास्त्र’ OTT वरही अनेक भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधून हा चित्रपट पाहू शकणार आहेत.

Brahmastra

Brahmastra On OTT : शक्तिशाली शस्त्रास्त्रांची ताकद दाखवणारा ‘ब्रह्मास्त्र’ OTT वरही अनेक भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधून हा चित्रपट पाहू शकणार आहेत.

  • Brahmastra On OTT : शक्तिशाली शस्त्रास्त्रांची ताकद दाखवणारा ‘ब्रह्मास्त्र’ OTT वरही अनेक भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधून हा चित्रपट पाहू शकणार आहेत.

Brahmastra On OTT : जबरदस्त व्हीएफएक्स आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यांचा सुंदर मिलाफ साधलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या ओटीटी रिलीज डेटबाबत सातत्याने विविध अंदाज बांधले जात होते. मात्र, आता हा चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ तुम्ही घरी बसून कधी आणि कुठे पाहू शकता ते जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

शक्तिशाली शस्त्रास्त्रांची ताकद दाखवणारा ‘ब्रह्मास्त्र’ OTT वरही अनेक भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधून हा चित्रपट पाहू शकणार आहेत. आज म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी ‘ब्रह्मास्त्र’ ओटीटी प्लॅटफॉर्म ‘डिस्ने+ हॉटस्टार’वर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे, ज्याचे दिग्दर्शन आणि लेखन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कलाकारांसह या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी खास आहे. या चित्रपटासाठी अयान मुखर्जीने तब्बल ८ वर्षे घालवली. या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), नागार्जुन (nagarjuna), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावर प्रचंड टीका झाली. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. याच चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि आलियाच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती.

९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक आणि चाहते आता घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा टीव्हीवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहेत. चित्रपटगृहाप्रमाणेच या चित्रपटाला ओटीटीवरदेखील उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मेकर्सनी व्यक्त केली आहे.

विभाग

पुढील बातम्या