मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautel: सर्वाधिक ब्यूटी टायटल्स जिंकणारी अभिनेत्री, वाढदिवशी उर्वशी विषयी खास गोष्टी

Urvashi Rautel: सर्वाधिक ब्यूटी टायटल्स जिंकणारी अभिनेत्री, वाढदिवशी उर्वशी विषयी खास गोष्टी

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 25, 2023, 08:31 AM IST

    • Urvashi Rautel Birthday Special: उर्वशी रौतेलाने वयाच्या १५व्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिला आजवर अनेर ब्यूटी टायटल्स मिळाले आहेत.
Urvashi Rautela (HT_PRINT)

Urvashi Rautel Birthday Special: उर्वशी रौतेलाने वयाच्या १५व्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिला आजवर अनेर ब्यूटी टायटल्स मिळाले आहेत.

    • Urvashi Rautel Birthday Special: उर्वशी रौतेलाने वयाच्या १५व्या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिला आजवर अनेर ब्यूटी टायटल्स मिळाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिने जिंकलेल्या किताबामुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही दिवसांपासून उर्वशीचे नाव हे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले जात आहे. मात्र अद्याप यावर दोघांनीही उघडपणे बोललेलं नाही. आज २५ फेब्रुवारी रोजी उर्वशीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

उर्वशी रौतेलाचा जन्म उत्तराखंड येथे झाला. तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती रौतेला कुटुंबातील पहिली सदस्य आहे जिने बॉलिवूडमध्ये नाव कामावले आहे. इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी उर्वशी ही नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेअर होती. ती एक क्लासिकल डान्सर आहे. तिला पाच डान्स फॉर्म्स येतात.
वाचा: ब्रश करता-करता गाणं गायला लागला पठ्ठ्या; आवाज ऐकून चकीत व्हाल!

वयाच्या १५व्या वर्षी उर्वशीने मॉडेलिंगच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीक’मध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तिला अनेक ऑफर्स येऊ लागल्या होत्या. सर्वाधीक ब्यूटी टायटल्स स्वत:च्या नावे करण्याचा रेकॉर्ड उर्वशीने केला आहे. तिने आजवर अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. ‘मिस यूनिवर्स पेजेंट २०१५’मध्ये तिने भारताचे नेतृत्व केले होते. २०२१मध्ये तिने मिस यूनिवर्समध्ये परिक्षक म्हणून सहभाग घेतला होता.

उर्वशीने ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘काबिल’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

विभाग

पुढील बातम्या