मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: टीना-शालीनच्या आरोपांचा खेळ सुरूच; प्रेक्षकही संतापले! जाणून घ्या नेमकं काय घडलं...

Bigg Boss 16: टीना-शालीनच्या आरोपांचा खेळ सुरूच; प्रेक्षकही संतापले! जाणून घ्या नेमकं काय घडलं...

Jan 21, 2023, 08:38 AM IST

    • Bigg Boss 16 Latest Update: टीना दत्ताने प्रियांकाच्या समोर शालीनची अनेक गुपिते उघड केली. टीनाने सांगितले की, घरात येण्यापूर्वी शालीनने तिच्याशी संपर्क साधला होता.
Bigg Boss 16

Bigg Boss 16 Latest Update: टीना दत्ताने प्रियांकाच्या समोर शालीनची अनेक गुपिते उघड केली. टीनाने सांगितले की, घरात येण्यापूर्वी शालीनने तिच्याशी संपर्क साधला होता.

    • Bigg Boss 16 Latest Update: टीना दत्ताने प्रियांकाच्या समोर शालीनची अनेक गुपिते उघड केली. टीनाने सांगितले की, घरात येण्यापूर्वी शालीनने तिच्याशी संपर्क साधला होता.

Bigg Boss 16 Latest Update: बिग बॉस १६’चा खेळ आता अंतिम टप्प्याकडे सरकत अआहे. अशावेळी घरातील स्पर्धक आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. एकमेकांसोबतच्या नात्यामुळे गाजलेली जोडी अर्थात शालीन भानोत आणि टीना दत्ता आता एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. गेल्या काही भागांपासून शालीन आणि टीना एकमेकांवर अनेक आरोप करत आहेत. आता टीना दत्ताने शालीनविषयी अनेक खुलासे केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग! "शक्तिमान" चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुक्ताच्या आईचा अपघात करणाऱ्याचे नाव आले समोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

टीना दत्ताने प्रियांकाच्या समोर शालीनची अनेक गुपिते उघड केली. टीनाने सांगितले की, घरात येण्यापूर्वी शालीनने तिच्याशी संपर्क साधला होता. यावेळी शालीनने तिला ऑफर देखील दिली होती की, ते दोघे या घरात एकत्र खेळू शकतात आणि त्यांच्या टीममध्ये गौतम विग आणि साजिद खान देखील असतील. टीनाच्या या खुलाशानंतर प्रियांकाला धक्का बसला. तिने म्हटले की, याचा अर्थ तो सगळं काही बाहेरूनच ठरवून आला आहे. यावेळी टीना म्हणाली कि, त्याने माझ्याकडे अंतर्वस्त्रांची मागणी देखील केली होती.

टीनाचे वक्तव्य ऐकून आता नेटकरी आणि प्रेक्षक देखील संतापले आहेत. जर टीनाला आधीच या सगळ्या गोष्टी माहित होत्या तर तिने सुरुवातीला शालीनला का पाठिंबा दिला?, असा प्रश्न प्रेक्षक करत आहेत.

छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसचा १६वा सीझन आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे सरकला आहे. गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये एका झटक्यात तीन स्पर्धकांना शोमधून बाहेर काढण्यात आले होते. तीन स्पर्धक बेघर झाल्यानंतर आता घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. शोमधील गेले १०० हून अधिक दिवस टिकून राहिलेल्या सर्वांच्याच नजरा ट्रॉफीवर खिळल्या आहेत. आता बिग बॉस स्पर्धकांना फिनालेचे तिकीट जिंकण्याची संधी देखील देणार आहेत.

पुढील बातम्या