मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhakshak Review: सई ताम्हणकर आणि भूमी पेडणेकरचा 'भक्षक' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Bhakshak Review: सई ताम्हणकर आणि भूमी पेडणेकरचा 'भक्षक' सिनेमा कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 14, 2024, 01:35 PM IST

    • Sai Tamhankar Bhakshak Movie Review: 'भक्षक' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. या चित्रपटाची कथा काय आहे चला जाणून घेऊया..
Bhakshak Review

Sai Tamhankar Bhakshak Movie Review: 'भक्षक' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. या चित्रपटाची कथा काय आहे चला जाणून घेऊया..

    • Sai Tamhankar Bhakshak Movie Review: 'भक्षक' हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. या चित्रपटाची कथा काय आहे चला जाणून घेऊया..

Bhakshak Movie Review: आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींविषयी ऐकत असतो. मग ते समोरच्या व्यक्तीकडून किंवा इतर कोणा कडून. पण कधी तुम्ही दुसऱ्याच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे का? किंवा ते दु:ख दूर करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत केली आहे का? आजकाल आपण आपलीच तुलना मनुष्यप्राण्यासोबत करत असतो. कारण आपण 'भक्षका'सारखे वागू लागलो आहोत. याच विषयावर आधारित 'भक्षक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा कशी आहे चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

चित्रपटाची कथा

'भक्षक' या चित्रपटात पत्रकार वैशाली सिंगची कथा दाखवण्यात आली आहे. ती एक यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घडामोडी सांगताना दिसते. पण तिच्या चॅनेलला फारसे व्ह्यूज आणि सब्सक्रायबर नसतात. तिला इतरांपेक्षा वेगळे काही करायचे असते. अशातच तिच्याकडे मुजफ्फरपुरच्या बालिका आश्रमातील लहान लहान मुलींवर अत्याचार होत असल्याची माहिती येते. त्यानंतर वैशालीची त्या मूलींची सुटका करण्यासाठी धडपड सुरु होते. दरम्यान आदित्य श्रीवास्तव या खलनायकाची एण्ट्री होते. तो या बालिका आश्रमाचा जवळपास मालक दाखवला आहे. तो सतत वैशालीला माघार घेण्यासाठी धमक्या देत असतो. पण वैशाली मात्र या सगळ्याला खंभीरपणे उत्तर देते. हे सगळं करत असताना कुटुंबीयांना होणारा त्रास, येणाऱ्या धमक्या या सगळ्याला वैशाली निडरपणे समोरी जाते. त्यानंतर सिनेमात SSP जस्मित कौर या महिला अधिकाऱ्याची एण्ट्री होती. ही भूमिका अभिनेत्री सई ताम्हणकर साकारताना दिसत आहे. जस्मित कौर या पात्राने चित्रपटाची कथा पूर्ण पणे बदलून जाते. ती वैशाली पाठिंबा देऊन तिने काय करायला हवे यासाठी मदत करते. आता वैशाली त्या मुलींना तेथून सोडण्यासाठी यशस्वी झाली का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागणार आहे.
वाचा: अडल्ट सिनेमा ते दिग्दर्शकाला मारहाण; जाणून घ्या रश्मी देसाई विषयी

चित्रपटातील कलाकारांचा अभिनय

सिनेमातील नायिका वैशाली विषयी बोलायचे झाले तर पत्रकार 'वैशाली' गंभीर प्रश्नांना साद घालणारी आहे. लग्न करून स्वतःचे पत्रकारितेतील पॅशन पूर्ण झाल्याशिवाय मुल जन्माला न घालण्याचा विचार करणारे पात्र आहे. तिची घर आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या साभाळताना होणारी तारेवरची कसरत दाखवण्यात आली आहे. या सगळ्यात भूमिचा अभिनय हा उत्कृष्ठ आहे. सिनेमामध्ये जेवढी भूमी ची व्यक्तिरेखा महत्वाची होती तशीच सिनेमाच्या खलनायकाची होती तो म्हणजे CID फेम आदित्य श्रीवास्तव यांनी त्याला उत्तम न्याय दिलाय, अगदी शोभणारा व्हिलन म्हणावे लागेल. आदित्यने उत्तम तगडा खलनायक उभा केलाय आणि त्यापुढे वैशाली फिकी पडल्याचे जाणवले. तसेच सईची एसएसपी जस्मित कौर ही गंभीर भूमिका चित्रपटाचे कथानक बदलून टाकते.

चित्रपट का पाहावा?

'भक्षक' हा चित्रपट अतिशय परिपूर्ण असल्याचे जाणवते. चित्रपटातील काही प्लॉट हे महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करताना दिसतात. तसेच समाज आणि शासन व्यवस्थेवरील वेगवेगळ्या मानसिक विचारांच्या व्यक्तीतरेखा समोर घेऊन येण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न सफल झाला आहे. अशा घटनांवर आधारित अनेक सिनेमे आजवर आले आहेत. पण नंतर ते गायब होतात. आजही उत्तर प्रदेश, बिहार मधील परिस्थिती फारशी बदललेली नाही. तेथील हजारो नराधमांचा खात्मा तर झाला आहे, पण अशा अनेक राहिलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात बोलण्यास कोणी तयार नाही.

विभाग

पुढील बातम्या