मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashami Desai: अडल्ट सिनेमा ते दिग्दर्शकाला मारहाण; जाणून घ्या रश्मी देसाई विषयी

Rashami Desai: अडल्ट सिनेमा ते दिग्दर्शकाला मारहाण; जाणून घ्या रश्मी देसाई विषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 13, 2024 08:06 AM IST

Rashami Desai Birthay: आज १३ फेब्रुवारी रोजी रश्मीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Rashami Desai
Rashami Desai

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. अडल्ट चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या रश्मीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज १३ फेब्रुवारी रोजी रश्मीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

रश्मीचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ साली आसाम राज्यातील नागावमध्ये झाला. ती मूळची गुजरातची. तिच्या भावाचे नाव गौरव देसाई आहे. रश्मीने टुरीझम आणि ट्र्रॅव्हलमध्ये शिक्षण घेतले आहे. मुंबईतील एका कॉलेजमधून तिचे शिक्षण झाले आहे.
वाचा: हार्दिक जोशी म्हणतोय, 'काका मला वाचवा...', काय आहे प्रकरण?

करिअरच्या सुरुवातीत्या काळात रश्मीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ती काम मिळवण्यासाठी दिग्दर्शकांकडे विनंती करावी लागत होती. याच दरम्यान, एका दिग्दर्शकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. रश्मीच्या आईला याबाबत कळाले तेव्हा त्यांनी त्या दिग्दर्शकाला अक्षरश: मारहाण केली.

रश्मीने एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता. 'एका व्यक्तीने मला फोन करु ऑडिशनसाठी बोलावले होते. मी तेथे पोहोचले तर कोणीच नव्हते. मी एकटी होते. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये नशेचे औषध टाकले आणि माझ्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मला जेव्हा जाणवले तेव्हा मी तेथून बाहेर पडले' असे रश्मी देसाई म्हणाली होती.

दिग्दर्शकाला मारहाण

समोर आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी रश्मी देसाईच्या आईने त्या व्यक्तीला शोधून काढले आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर हळूहळू रश्मीला काही मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. रश्मीने काही रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. तसेच काही भोजपूरी चित्रपटांमध्ये ही ती दिसली होती.

रश्मीच्या कामाविषयी

रश्मीने २००६ साली रावण या मालिकेत काम केले. त्यानंतर २००८ तिची तिने परी हू मै ही मालिका विशेष गाजली. पण उतरण या मालिकेतील तपस्या ठाकूर या भूमिकेने रश्मीला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. रश्मीने जरा नचके दिखा २, झलक दिखला जा ५, फिअर फॅक्टर, नच बलिये ६ या शोमध्ये सहभाग घेतला. २०१२मध्ये रश्मी दबंग २ चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

WhatsApp channel

विभाग