मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा 'हा' नवाकोरा सिनेमा थिएटरऐवजी थेट टेलिव्हिजनवर होणार प्रदर्शित

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरचा 'हा' नवाकोरा सिनेमा थिएटरऐवजी थेट टेलिव्हिजनवर होणार प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

May 05, 2023, 11:35 AM IST

    • Autograph: टेलिव्हिजनच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की एखादा नवा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्याऐवजी थेट प्रेक्षकांना घर बसल्या टीव्हीवर पाहाता येणार आहे.
Amruta Khanvilkar

Autograph: टेलिव्हिजनच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की एखादा नवा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्याऐवजी थेट प्रेक्षकांना घर बसल्या टीव्हीवर पाहाता येणार आहे.

    • Autograph: टेलिव्हिजनच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की एखादा नवा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्याऐवजी थेट प्रेक्षकांना घर बसल्या टीव्हीवर पाहाता येणार आहे.

आजकाल अनेक सिनेमा येत असतात आणि जात असतात. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरतात तर काही सिनेमे कथानक चांगले असूनही फ्लॉप ठरताना दिसतात. पण आता पहिल्यांदाच एक नवाकोरा सिनेमा चित्रपटगृहांऐवजी थेट टेलिव्हिजनवर प्रदर्शित होताना दिसणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'ऑटोग्राफ' असे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

प्रेमापेक्षा नातं महत्वाचं... कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे 'ऑटोग्राफ' सिनेमा. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलीय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मचअवेटेड सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या अगोदर स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.
वाचा: अखेर अर्जुनचा भ्रष्टाचार होणार अप्पीसमोर उघड

रविवार १४ मेला दुपारी १ वाजता घरबसल्या प्रेक्षकांना या अनोख्या लव्हस्टोरीचा आनंद प्रेक्षकांना घर बसल्या घेता येणार आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा नवाकोरा सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी स्टार प्रवाहवर प्रदर्शित होत आहे.

ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या सिनेमाविषयी सांगताना म्हणाले, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे . जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे. दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय.’

पुढील बातम्या