मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Fadnavis Video: ट्राफिकमध्ये अडकल्या अमृता फडणवीस, वेळ घालवण्यासाठी केला गाडीत डान्स

Amruta Fadnavis Video: ट्राफिकमध्ये अडकल्या अमृता फडणवीस, वेळ घालवण्यासाठी केला गाडीत डान्स

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 18, 2023, 12:05 PM IST

    • Amruta Fadnavis Dance Video: नुकताच अमृता यांनी सोशल मीडियावर एक रिल्स शेअर केले आहे. हे रिल्स पाहून अनेकांनी अमृता यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Amruta Fadnavis Dance Video

Amruta Fadnavis Dance Video: नुकताच अमृता यांनी सोशल मीडियावर एक रिल्स शेअर केले आहे. हे रिल्स पाहून अनेकांनी अमृता यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

    • Amruta Fadnavis Dance Video: नुकताच अमृता यांनी सोशल मीडियावर एक रिल्स शेअर केले आहे. हे रिल्स पाहून अनेकांनी अमृता यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या कायम चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावर दररोज काही ना काही पोस्ट करताना दिसतात. अनेकदा त्यांना या पोस्टमुळे ट्रोल देखील केले जाते. पण ट्रोलर्सकडे दुलर्क्ष करत अमृता पोस्ट करताना दिसतात. नुकताच अमृता यांनी सोशल मीडियावर एक रिल्स शेअर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

अमृता यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर गाडीत बसून डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी “ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर थोडंसं मनोरंजन…” असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर अमृता यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: शिवाजी साटम यांच्या सुनेला पाहिलेत का? करणार 'या' नाटकात काम

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केले आहे. “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…” असे म्हणत एका नेटकऱ्याने अमृता फडणवीस यांना सुनावले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “ही पोस्ट डिलिट करा अमृता ताई” असा सल्ला दिला आहे. तिसऱ्या एका यूजरने “हे असले गरजेचे आहे का?” असे म्हटले आहे. चौथ्या एका यूजरने अमृता यांच्या व्हिडीओचे समर्थन करत “त्यांना स्वातंत्र्य आहे… त्या काहीही चुकीचे करत नाहीत” असे म्हटले आहे.

विभाग

पुढील बातम्या