मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amitabh Bachchan: जय श्रीराम! अमिताभ बच्चन पोहोचले अयोध्येत

Amitabh Bachchan: जय श्रीराम! अमिताभ बच्चन पोहोचले अयोध्येत

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 10, 2024, 08:13 AM IST

    • Amitabh Bachchan In Ayodhya: अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक मोठे विधान हे केले आहे, ज्यानंतर अमिताभ बच्चन हे तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे.
Amitabh Bachchan

Amitabh Bachchan In Ayodhya: अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक मोठे विधान हे केले आहे, ज्यानंतर अमिताभ बच्चन हे तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे.

    • Amitabh Bachchan In Ayodhya: अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक मोठे विधान हे केले आहे, ज्यानंतर अमिताभ बच्चन हे तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे.

Amitabh Bachchan In Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना केली गेली. एका मोठ्या संघर्षानंतर अखेर रामजन्मभूमीत पुन्हा एकदा जल्लोषात प्रभू रामाचे स्वागत करण्यात आले. या भव्य सोहळ्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार देखील अयोध्येत पोहोचले होते. त्यानंतर आता बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे देखील अयोध्येत पोहोचले आहेत. त्यांनी फोटोशेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

अमिताभ बच्चन हे एका ज्वेलरी शॉपच्या उद्धाटनासाठी अयोध्येत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आता याचेच काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी देखील अमिताभ बच्चन हे पोहचले होते.
वाचा: रूममध्ये एकटीच असताना त्याने मला...; अंकिता लोखंडेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

दर्शन घेतल्यानंतर अमिताभ बच्चन हे थेट अयोध्याचे मंडल कमिश्नर गौरव दयाल यांच्या घरी पोहचले. विशेष म्हणजे गौरव दयाल यांच्या घरी अजूनही काही अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन हे खास संवाद साधताना दिसले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देताना अमिताभ बच्चन हे दिसले. "आता अयोध्येला नेहमीच येणे जाणे सुरू असेल माझे. मला बरेच लोक मी जिथे जाईल तिथे म्हणतात की, मुंबईला राहतात. इथे येणे जाणे होणार नाही. माझा जन्म हा अलाहाबादमध्ये झाला आहे आणि आम्ही त्यानंतर दिल्ली, कोलकाता मुंबईमध्ये राहिलो. कोलकाता, दिल्ली आणि मुंबईत राहिलो हे खरे पण कुठेही गेले तरीही ‘छोरा गंगा किनारे वाला’च म्हटले जाते" असे अमिताभ बच्चन म्हणाले.

पुढील बातम्या