मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankita Lokhande: रूममध्ये एकटीच असताना त्याने मला...; अंकिता लोखंडेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Ankita Lokhande: रूममध्ये एकटीच असताना त्याने मला...; अंकिता लोखंडेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 08, 2024 10:29 AM IST

Ankita Lokhande Casting Couch: अंकिताने बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

Ankita Lokhande gets emotional
Ankita Lokhande gets emotional

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. तिने बिग बॉस १७च्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. मात्र, विजेते पद पटकावण्याची संधी थोडक्यात हुकली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अंकिताने काही वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने खासगी आयुष्याबाबत खुलासा केला.

अंकिताने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

अंकिताने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. तिने तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळावर भाष्य केले. "खूप वर्षांपूर्वी मला एका साऊथ चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. तेव्हा एका व्यक्तीने मला एका रुममध्ये बोलवले होते. त्या रुममध्ये मी एकटीच होते. मी तेव्हा १९ ते २० वर्षाची होते. तिथे आलेल्या एका व्यक्तीने मला कॉम्प्रमाइजबद्दल सांगितले. मी त्यांना विचारले की, मला कोणत्या प्रकारचे कॉम्प्रमाइज करावे लागेल? मला पार्टीला जावे लागले की डिनरला जावे लागेल. माझ्यासोबत बोलणारी व्यक्ती मला म्हणाली की, तुला निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. तेव्हा मी त्याच्यावर खूप चिडले. नंतर मी तिथून निघून गेले" असे अंकिता म्हणाली.
वाचा: चेहऱ्यावर फोड, पाठीला बाक; मराठमोळ्या अभिनेत्याची झाली बिकट अवस्था

पुढे ती म्हणाली की, "मला वाटते, तुमच्या चित्रपटाच्या निर्मात्याला एका अतिशय हुशार अभिनेत्रीसोबत काम करायचे नाही. तर त्याला फक्त तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, असे त्या व्यक्तीला म्हणून मी तिथून निघून गेले."

कास्टिंग काऊचचा दुसरा अनुभव

या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा आणखी एक अनुभव सांगितला आहे. "जेव्हा मी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला एका व्यक्तीला शेकहँड करताना विचित्र वाटले. मला त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही कारण तो मोठा अभिनेता आहे. मला विचित्र वाटल्यानंतर मी लगेच माझा हात झटकला केला" असे अंकिता म्हणाली.

अंकिताचे आगामी चित्रपट

'बिग बॉस १७'च्या घरातून बाहेर पडताच अंकिता लोखंडे 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अंकितासोबत अभिनेता रणदीप हुड्डा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याचे म्हटले जात होते.

WhatsApp channel

विभाग