मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sampath J ram: पत्नीला घाबरवण्यासाठी अभिनेत्याने केला सुसाइड प्रँक, झाला मृत्यू

Sampath J ram: पत्नीला घाबरवण्यासाठी अभिनेत्याने केला सुसाइड प्रँक, झाला मृत्यू

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 26, 2023, 09:33 AM IST

    • Sampath J ram: अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मित्राने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
Sampath J ram

Sampath J ram: अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मित्राने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

    • Sampath J ram: अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मित्राने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

कन्नड अभिनेता संपत जे रामचे २२ एप्रिल रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला. संपतने कर्नाटकमधील नेलमंगला येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आता संपतच्या जवळचा मित्र राजेश ध्रुवने एक धक्कादायक खुलासा केला आहे. प्रँक करताना अभिनेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती मित्राने दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

अभिनेता राजेश ध्रुव हा संपतचा चांगला मित्र आहे. राजेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राजेश बोलताना दिसत आहे की, कपलमध्ये (संपत आणि त्याची पत्नी) रात्री भांडण झाले होते. त्यानंतर संपदने स्वत:ला फासी घेण्याचा प्रँक केला. जेणे करुन तो पत्नीला घाबरवेल. पण दुर्दैवाने या सगळ्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राजेशने नेटकऱ्यांना संपत विषयी कोणत्याही अफवा पसरवू नका असे आवाहन केले.
वाचा: त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार?

संपत जे राम आणि राजेश ध्रुव यांनी एकत्र टीव्ही मालिका अग्निसाक्षीमध्ये एकत्र काम करत करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र चित्रपटात काम देखील केले. संपतच्या निधनानंतर तो नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले असे देखील बोलले जात आहे. संपतची पत्नी पाच महिन्यांची गर्भवती आहे.

पुढील बातम्या