मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gumraah Review: एक गुन्हा अन् एकसारखे दिसणारे दोन संशयित; चित्रपटाची कथाच झाली ‘गुमराह’?

Gumraah Review: एक गुन्हा अन् एकसारखे दिसणारे दोन संशयित; चित्रपटाची कथाच झाली ‘गुमराह’?

Apr 07, 2023, 01:01 PM IST

  • Gumraah Movie Review: ‘गुमराह’ हा चित्रपट साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात कथेत काहीशा त्रुटी पाहायला मिळत आहेत.

Gumraah Movie Review

Gumraah Movie Review: ‘गुमराह’ हा चित्रपट साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात कथेत काहीशा त्रुटी पाहायला मिळत आहेत.

  • Gumraah Movie Review: ‘गुमराह’ हा चित्रपट साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात कथेत काहीशा त्रुटी पाहायला मिळत आहेत.

Gumraah Movie Review: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटानंतर ‘आशिकी २’ फेम आदित्य रॉय कपूर आणि ‘सीतारामम’ फेम मृणाल ठाकूर यांचा ‘गुमराह’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. स्क्रिप्ट, दिग्दर्शन आणि अभिनय सगळ्याच दृष्टीने हा तसा छोट्या बजेटचा चित्रपट आहे. यात फारचा कमी अ‍ॅक्शन सीन असून, व्हीएफएक्सचा वापरही कमी करण्यात आला आहे. ‘गुमराह’ हा चित्रपट साऊथच्या ‘थडम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात कथेत काहीशा त्रुटी पाहायला मिळत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

मुक्ताला कळाले सत्य, माधवीने पाहिली ती कार.. काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत?

या चित्रपटाची कथा अतिशय साधी आणि सोपी आहे. ज्यांनी ‘थडम’ हा चित्रपट पाहिला आहे, त्यांना चित्रपटाच्या कथेची कल्पना येईल. या चित्रपटाच्या कथेत एक खून होतो आणि पोलीस या खुन्याचा शोध घेत असताना एक फोटो पोलिसांपर्यंत पोहोचतो, ज्यावरून अंदाज लावता येतो की, खूनी कोण आहे. यानंतर पोलीस फोटोमध्ये दिसणार्‍या व्यक्तीला उचलून नेतात. त्यानंतर त्या व्यक्तीला खूप मारहाण केली जाते. त्याचा छळ केला जातो. मात्र, तरीही पोलीस सत्य शोधू शकत नाहीत. त्यानंतर पोलीस त्याच्या सारख्या दिसणाऱ्या आणखी एका व्यक्तीला पकडतात. आता या दोघांपैकी नक्की खरा गुन्हेगार कोण? याचा खुलासा होतो आणि हा चित्रपट संपतो.

चित्रपटातील आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूर आणि रोनित रॉय यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे, तर आदित्य रॉयच्या दुहेरी भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. आदित्य रॉय कपूरने ‘आशिकी २’ नंतर असा एक चांगला चित्रपट निवडला आहे, असे प्रेक्षक म्हणत आहेत. दुसरीकडे ‘गुमराह’ या चित्रपटाची कथा मात्र कमकुवत असल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले, तर काहींना या चित्रपटाची कथा आवडली आहे. तर, काहींना मात्र हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. चित्रपटाची लांबीही इतर चित्रपटांच्या तुलनेत मोठी आहे. याशिवाय चित्रपटातील सस्पेन्सबद्दल बोलायचे झाले, तर हा सस्पेन्स मात्र काहीसा गडबडला आहे. त्यामुळे एकंदरीत ‘गुमराह’ हा एक सामान्य चित्रपट असून, याची कथाच गुमराह झाली आहे का? असे वाटत आहे. पण, जर तुम्ही अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूरचे चाहते असाल, तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

पुढील बातम्या