मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush: ‘आदिपुरुष’च्या रिलीज आधीच कलाकार बालाजीच्या चरणी; चित्रपटाच्या यशासाठी घातलं साकडं!

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या रिलीज आधीच कलाकार बालाजीच्या चरणी; चित्रपटाच्या यशासाठी घातलं साकडं!

Jun 06, 2023, 12:26 PM IST

  • Adipurush Prabhas: या दरम्यान प्रभासचा पांढरा कुर्ता आणि लाल दुपट्टा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Adipurush Prabhas

Adipurush Prabhas: या दरम्यान प्रभासचा पांढरा कुर्ता आणि लाल दुपट्टा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Adipurush Prabhas: या दरम्यान प्रभासचा पांढरा कुर्ता आणि लाल दुपट्टा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Adipurush Prabhas: सध्या ‘बाहुबली’ अभिनेता प्रभास त्याच्या आगामी'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक ओम राऊत याचा हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वी संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान नुकतीच क्रिती सेनन पंचवटीतील सीता मातेच्या मंदिरात आरती करताना दिसली होती. तर, आता प्रभास तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला आहे. पहाटेचं वेळी त्याने या मंदिराला भेट दिली. सोशल मीडियावर प्रभासचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘हम दो हमारे १२’ नव्या चित्रपटामुळे अन्नू कपूर यांना जीवे मारण्याच्या धमक्या! पोलिसांकडे मागितलं संरक्षण

'रघु बोलला आणि विषय संपला'! आहे तरी कोण हा ‘रघु ३५०’? मराठी चित्रपटातून लवकरच उलगडणार कोडं!

जान्हवी आणि राजकुमार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 'मिस्टर अँड मिसेस माही'ने पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!

‘बिग बॉस ओटीटी ३’ ते ‘कोटा फॅक्टरी ३’; जून महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेब सीरिज!

प्रभासचा पांढरा कुर्ता आणि लाल दुपट्टा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रभासने ट्विटमध्ये लिहिले की, 'आदिपुरुषाच्या प्री रिलीज कार्यक्रमापूर्वी आज सकाळी तिरुमला येथे श्री वेंकटेश्वर स्वामींच्या प्रभात सेवेत सहभागी झालो.’

Gufi Paintal: आधी इंजिनिअर, मग सैनिक... असा होता 'महाभारत'च्या 'शकुनी मामा'चा प्रवास!

आज (६ जून) संध्याकाळी तिरुपतीमध्ये'आदिपुरुष'चा प्री-रिलीज कार्यक्रम पार पडणार आहे. आज सकाळी अभिनेता प्रभासने तिरुपती बालाजीचे आशीर्वाद घेतले. चिन्ना जेयर स्वामी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात येणार असून, तो सोशल मीडियावर लाईव्हही करण्यात येणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने या चित्रपटात रामाची भूमिका साकारली असून, क्रिती सेननने सीतेची भूमिका साकारली आहे. तर, सैफ अली खानने ‘रावण’ आणि देवदत्त नागे यांनी ‘हनुमाना’ची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सनी सिंहने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे.

ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला'आदिपुरुष' हा चित्रपट रामायणाची आधुनिक आवृत्ती असणार आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटी आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

विभाग

पुढील बातम्या