logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'रघु बोलला आणि विषय संपला'! आहे तरी कोण हा ‘रघु ३५०’? मराठी चित्रपटातून लवकरच उलगडणार कोडं!

'रघु बोलला आणि विषय संपला'! आहे तरी कोण हा ‘रघु ३५०’? मराठी चित्रपटातून लवकरच उलगडणार कोडं!

Published Jun 01, 2024 12:26 PM IST

google News
  • रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे आगामी 'रघु ३५०' चित्रपटातून कळेल.

आहे तरी कोण हा ‘रघु ३५०’?

रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे आगामी 'रघु ३५०' चित्रपटातून कळेल.

  • रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे आगामी 'रघु ३५०' चित्रपटातून कळेल.

मराठी मनोरंजन विश्वात आता दररोज काही ना काही नवीन प्रयोग होताना पाहायला मिळत आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरून आता चित्रपट अधिक रंजक बनवण्याचा प्रयत्न निर्माते देखील करत आहेत. अशातच मराठीतही ॲक्शन आणि भयपट चांगलेच गाजू लागले आहेत. रहस्यमय कथा प्रेक्षकांना देखील आवडू लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वात आजवर रोमँटिक, ॲक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे 'रघु ३५०'. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पोस्टरवरून हा चित्रपट एक आशयघन आणि रहस्यमय कथानक घेऊन मोठा पडदा गाजवण्यास सज्ज होत असल्याचं समोर आलं आहे.

पण, चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट ऍक्शनची साथ देणार की, रोमान्सची याची उत्सुकता वाढून राहिली आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाने नावावरूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

कोण झळकणार?

अद्याप या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे समोर आलेलं नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर असलेला बाईक चालवणारा तो तरुण नेमका आहे तरी कोण? याचीही साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर, दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे.

गुपित लवकरच उलगडणार!

रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल उलगडणार हे आगामी 'रघु ३५०' चित्रपटातून कळेल. बाईकवरून रावडी एन्ट्री घेतलेला तो इसम नेमका कोण आहे?, हे देखील गुलदस्त्यात असून या पोस्टरवरून हा चित्रपट ऍक्शनपट असल्याचं बोललं जातं. या नव्या कोऱ्या चित्रपटातून नेमकं कोणतं कथानक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार हे २ ऑगस्ट २०२४ रोजी कळणार आहे. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.