मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मान कापणाऱ्याने आपली मान कापायच्या आधी...; सावरकरांचा संदर्भ देत शरद पोंक्षेंनी शेअर केला व्हिडीओ

मान कापणाऱ्याने आपली मान कापायच्या आधी...; सावरकरांचा संदर्भ देत शरद पोंक्षेंनी शेअर केला व्हिडीओ

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 21, 2022, 02:55 PM IST

    • Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
शरद पोंक्षे (HT)

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

    • Sharad Ponkshe: शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमधून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ शेअर करत त्यानी सावरकरांचे विचार मांडले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान वीर सावरकरांचं नाव घेत टीका केली होती. यावरून राजकीय नेत्यांकडून निषेध केला. त्यानंतर शरद पोंक्षेंनी अंदमानच्या तुरुंगातील व्हिडीओ शेअर केला होता. आता त्या पाठोपाठ त्यांनी सावरकरांच्याबद्दलचा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
वाचा: अथिया आणि केएल राहुल करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला...

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भाषणातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते “एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढं करायचा, असं म्हणतात. पण सावरकर म्हणतात की एक मान कापल्यावर पुढे करायला मानच राहत नाही, म्हणूनच मान कापणाऱ्याने आपली मान कापायच्या आधी आपणच त्याची मान कापायची, याला म्हणतात धर्म,” असे बोलताना दिसत आहेत.

महात्मा गांधी नेहमी सांगायचे व्यक्तीने आपल्या गालावर थप्पड मारली, तर दुसरा गाल पुढे करायचा. पण शरद पोंक्षेंनी मात्र या व्हिडीओमध्ये महात्मा गांधींचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्याच संदर्भाने सावरकरांचे विचार मांडले आहेत.

विभाग

पुढील बातम्या