मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamhi Saare Khavayye:२ वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' पुन्हा येणार

Aamhi Saare Khavayye:२ वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' पुन्हा येणार

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 22, 2022, 12:08 PM IST

    • जाणून घ्या हा कार्यक्रम कधी सुरु होणार? या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार?
आम्ही सारे खवय्ये (HT)

जाणून घ्या हा कार्यक्रम कधी सुरु होणार? या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार?

    • जाणून घ्या हा कार्यक्रम कधी सुरु होणार? या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार?

असं म्हणतात की, माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' नित्यनियमाने करत होता. पण आता जवळपास २ वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये सुरु होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे हेच या पर्वाची सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. कोल्हापूरपासून या पर्वाची सुरुवात होत असून महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटी मध्ये आम्ही सारे खवय्ये रंगणार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी हे या नवीन पर्वाचे नाव असून या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत आणि कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.
वाचा: अक्षय कुमारने माझा वापर केला आणि...; शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा

या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे. येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा एकदा आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम भेटीस येत आहे.

विभाग

पुढील बातम्या