मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Milind Gawali: 'एखादा पोलिसवाला कितीही करप्ट असला तरी...'; अभिनेते मिलिंद गवळी नेमकं काय म्हणाले?

Milind Gawali: 'एखादा पोलिसवाला कितीही करप्ट असला तरी...'; अभिनेते मिलिंद गवळी नेमकं काय म्हणाले?

Oct 14, 2023, 12:52 PM IST

  • Milind Gawali Viral Post:अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांवर भाष्य केलं आहे.

Milind Gawali

Milind Gawali Viral Post:अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांवर भाष्य केलं आहे.

  • Milind Gawali Viral Post:अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांवर भाष्य केलं आहे.

Milind Gawali Viral Post: छोट्या पडद्यावरची 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या तुफान गाजत आहे. या मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर आलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे जितके प्रेम मिळत आहे, तितकेच प्रेम यातील कलाकारांना देखील मिळत आहे. अनिरुद्ध, अरुंधती ते यश, गौरी, संजना आणि संपूर्ण देशमुख कुटुंब प्रेक्षकांचं लाडकं झालं आहे. या मालिकेत 'अनिरुद्ध' ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते नेहमीच वेवेगळ्या पोस्ट लिहीत असतात. नुकतीच त्यांनी एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांवर भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की, ‘चांगलं की वाईट... अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा स्टँड घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की, आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही. अनिरुद्धच नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे, असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे. काही काही परिस्थितीमध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, सरप्राईज करतो सगळ्यांना, मी पण ज्या वेळेला स्क्रिप्ट वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात. मनातल्या मनात नमिता वर्तक हिला थँक यू सुद्धा म्हणत असतो. पण, खरंच आहे किती वाईट माणूस असला, तरी काही काही बाबतीत माणसाने ठाम भूमिका घ्यायलाच हवी. योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी.’

Mission Raniganj: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ आता ऑस्करमध्ये दाखवणार जलवा; निर्मात्यांची मोठी घोषणा!

पुढे मिलिंद गवळी लिहितात, ‘मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, पण एखादा पोलिसवाला कितीही भ्रष्ट असला तरी असं म्हटलं जातं की, रेप, मर्डर, ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि ड्रग्स या केसेसमीध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही तो पैसे खात नाही. गुन्हेगाराला कधीही साथ देत नाही. कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या सीनमध्ये ज्यावेळेला तो आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो. त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्धची एक नव्याने ओळख होत जाते, आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुखच्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो. खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात. पण, अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात, प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की, आता अनिरुद्धची काय भूमिका आहे.’

पुढील बातम्या