मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  7 years of Sairat: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती

7 years of Sairat: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती

Aarti Vilas Borade HT Marathi

Apr 29, 2023, 09:40 AM IST

    • 7 years of Sairat: आज सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटातील काही खास किस्से..
Sairat

7 years of Sairat: आज सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटातील काही खास किस्से..

    • 7 years of Sairat: आज सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटातील काही खास किस्से..

मराठी चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपट असे आहेत जे प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटली आहेत. मात्र आजही प्रेक्षक ते चित्रपटात तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने पाहातात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'सैराट.' २०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सात वर्षे झाली आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

‘सैराट’या चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘सैराट’मुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचे शिखर गाठले. तिने साकारलेले आर्ची हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या भूमिकेसाठी आधी दुसऱ्या एका मुलीची निवड झाली होती.
वाचा: किम कार्दाशियन बनण्याच्या मोहात मॉडेलने केली प्लास्टिक सर्जरी; गमावला जीव!

अभिनेत्री सायली पाटीलची आर्ची या भूमिकेसाठी निवड झाली होती. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. सायली म्हणाली की, “मी खरं तर अपघाताने अभिनेत्री बनले आहे. मी तेव्हा ऑडिशनसाठीदेखील गेले नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना मला शॉर्टलिस्ट केले होते त्याचपद्धतीने इतर मुलींनादेखील केले होते.”

पुढे ती म्हणाली, “माझ्या ४ ते ५ ऑडिशन झाल्यानंतर नागराज सर म्हणाले आता तुझी जवळपास निवड करण्यात आली आहे. पण मी त्यांना म्हणाले मला नाही करायचे. कारण माझ्याकडून तरी असे काही नव्हते ती भूमिका मला करायची आहे. तो विषय तिथेच थांबला त्यानंतर ‘सैराट’ आला आणि मग ४ वर्षानंतर सरांनी मला ‘झुंड’साठी विचारले.”

विभाग

पुढील बातम्या