मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेचा प्रचार करायचा नाहीः भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांचा ठराव

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेचा प्रचार करायचा नाहीः भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांचा ठराव

Apr 06, 2024, 11:06 AM IST

    • BJP Opposed Shrikant Shinde : कल्याण लोकसभा मतदार संघात (kalyan lok sabha constituency) श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) समर्थकांनी त्यांचे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच भाजप उमेदवार असेल तरच प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे.
श्रीकांत शिंदेचा प्रचार करायचा नाहीः भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांचा ठराव

BJP Opposed Shrikant Shinde : कल्याण लोकसभा मतदार संघात (kalyan lok sabha constituency) श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) समर्थकांनी त्यांचे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच भाजप उमेदवार असेल तरच प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे.

    • BJP Opposed Shrikant Shinde : कल्याण लोकसभा मतदार संघात (kalyan lok sabha constituency) श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) समर्थकांनी त्यांचे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच भाजप उमेदवार असेल तरच प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे.

BJP Opposed Shrikant Shinde : कल्याण मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. भाजपने या मतदार संघावर दावा केला असतांना, आता जर भाजप उमेदवार न दिल्यास श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका गोळीबार प्रकरणातील आमदार गणेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसा ठराव काल रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे शिंदे आणि गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Modi : काँग्रेस सत्तेत आली तर राम मंदिरावर बुलडोझर चालवेल; नरेंद्र मोदी यांनी वाढवली प्रचाराची धार

Ujjwal Nikam : सरकारी कोट्यातून मुंबईत घर घेऊनही उज्ज्वल निकम हॉटेलात राहायचे; १७ लाख रुपयांचे बिल लावले?

Mumbai: राजकीय पक्ष करणार आज जिवाची मुंबई! शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकत्र, तर बीकेसीत इंडिया आघाडीची सभा

Uddhav Thackeray : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, उद्धव ठाकरेंचा भरपावसात हल्लाबोल

Rohit Pawar : खेकडा प्रकरणावरून रोहित पवार अडचणीत, खेकड्याचा छळ केल्याने पेटाची कारवाईची मागणी

कल्याण लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. येथील उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. येथून ते निवडणूक देखील आले आहेत. मात्र, या जागेवर भाजपने दावा केला असून अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मुळे एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. दरम्यान, या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये आता कलगितुरा चांगलाच रंगला आहे. शुक्रवारी रात्री हा वाद शिगेला पोहोचला. कारण, कल्याणमधील स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी बैठक घेत श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार न करण्याची भूमिका घेतली. त्यांनी ही जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह धरला असून जर ही जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसा ठरव देखील शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

MHT-CET PCM Exam: तारखांच्या गोंधळामुळे ५ मे रोजी होणारी अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश परीक्षा रद्द

बैठकीत काय झाले

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री गायकवाड यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कल्याण लोकसभेची जागा ही भाजपला मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. तसेच गणपत गायकवाड यांचे समर्थन करण्यासाठी मोठी घोषणा बाजी देखील यावेळी करण्यात आली.

Gudi Padwa : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी उभी राहणार कल्याणची गुढी! पर्यावरण रक्षणाचा देणार संदेश

कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात बैठकीबाबत काही माहिती नाही. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी होतो. दरम्यान, गणपत गायकवाड यांच्या पाठीशी केवळ कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्तेच नाही तर संपूर्ण भाजपचा त्यांना पाठिंबा आहे, असे भाजपचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले.

तर गणपत गायकवाड यांना जामीन देखील मिळणार नाही; शिंदे यांचे कार्यकर्ते भडकले

जमिनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भर पोलिस ठण्यातच गोळीबार केला होता. त्यामुळे भाजप आमदार गायकवाड समर्थक भाजप कार्यकर्ते यांनी कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांना मदत न करण्याची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील भडकले असून जर मदत केली नाही तर गणपत गायकवाड यांना जामीन देखील मिळू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

पुढील बातम्या