MHT-CET PCM Exam postponed : अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने या परीक्षांचे आयोजन ५ मे रोजी केले होते. मात्र, एकाच तारखेला दोन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेता. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.
अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी पुर्व परीक्षा घेतली जाते. ही पुर्व परीक्षा राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेल मार्फत घेतली जाते. गेल्या वर्षी या परीक्षेचे नॉटिफिकेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार ही परीक्षा ५ मे रोजी होणार होती. मात्र, या दिवशी नीट (NEET)ची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षांना मुकावे लागले असते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा दुसऱ्या तारखेला घेतली जावी अशी मागणी होत होती.
विद्यार्थी आणि पालकांची ही मागणी विचारात घेऊन तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या साठी राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शुक्रवारी नोटिस जारी करत या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. शुक्रवारी जारी केलेल्या नोटिसमध्ये, प्रवेश प्रक्रिया सेलने म्हटले आहे की, NEET UG 2024 परीक्षा ही ५ मे रोजी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच त्यांना दोन्ही परीक्षा देता येण्यासाठी ५ मे रोजी होणारी MHT-CET PCM परीक्षा पुढे ढकलन्यात आली आहे. या परीक्षेची दुसरी तारीख ही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे देखील सेलने म्हटले आहे.
ज्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र मिळाल्यानंतर, "वैयक्तिक कारणास्तव २ ते १७ मे दरम्यान असणारी MHT-CET PCM तारीख बदलायची आहे, त्यांनी CET सेलला त्यांच्या NEET UG 2024 प्रवेश पत्राच्या प्रतीसह त्यांची विनंती पाठवू शकतात, असे देखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने MHT CET 2024 ही परीक्षा २२ एप्रिल ते 17 मे २०२४ दरम्यान आयोजित केली होती. सेलने परीक्षेसाठी अर्ज दुरुस्त्या देखील पूर्ण केल्या. २२ मार्च २०२४ पर्यंत अनेकांनी या परीक्षेसाठी अर्ज देखील केले. प्राधिकरणाने १६ मार्च रोजी MHT CET नोंदणी शुल्क भरण्याची शेवटची तारीख दिली होती. यानंतर विलंब शुल्कासह नोंदणी थांबवण्यात आली. सीईटी सेलने १६ जानेवारी रोजी एमएचटी सीईटी अर्ज प्रक्रिया सुरू केली. यापूर्वी, एमएचटी सीईटी २०२४ परीक्षा १६ ते ३० एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित केली जाणार होती.
संबंधित बातम्या