मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi Nomination : रायबरेलीतून निवडणूक अर्ज भरताना राहुल गांधी यांनी दाखवली ताकद

Rahul Gandhi Nomination : रायबरेलीतून निवडणूक अर्ज भरताना राहुल गांधी यांनी दाखवली ताकद

May 03, 2024, 03:45 PM IST

  • Rahul Gandhi filed nomination from raebareli : जोरदार शक्ति प्रदर्शन करत आज राहुल यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केला. हा मतदार संघ कॉँग्रेसचा गढ मानला जातो. येथून फिरोज गांधींनी पहिली निवडणूक जिंकली होती.

जोरदार शक्ति प्रदर्शन करत राहुल गांधींनी भरला रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज! फिरोज गांधींनी जिंकली होती पहिली निवडणूक

Rahul Gandhi filed nomination from raebareli : जोरदार शक्ति प्रदर्शन करत आज राहुल यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केला. हा मतदार संघ कॉँग्रेसचा गढ मानला जातो. येथून फिरोज गांधींनी पहिली निवडणूक जिंकली होती.

  • Rahul Gandhi filed nomination from raebareli : जोरदार शक्ति प्रदर्शन करत आज राहुल यांनी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केला. हा मतदार संघ कॉँग्रेसचा गढ मानला जातो. येथून फिरोज गांधींनी पहिली निवडणूक जिंकली होती.

Rahul Gandhi filed nomination from Raebareli : राहुल गांधी यांनी आज रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ति प्रदर्शन राहुल गांधी यांनी केले. अर्ज दाखल करतांना राहुल गांधी यांच्या सोबत आई सोनिया गांधी, बहिणी प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. गांधी यांनी रायबरेली निवडणूक कार्यालयात पोहोचत उमेदवारी अर्ज दाखल केला.

ट्रेंडिंग न्यूज

Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातून निवृत्तीची घोषणा करत सोनिया गांधी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव राहूल गांधी यांना काँग्रेसने रायबरेलीतून उमेदवारी दिली आहे. आज सकाळी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काँग्रेसने जोरदार शक्ति प्रदर्शन करत राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित होते. रायबरेली येथून गेल्या २० वर्षांपासून सोनिया गांधी या खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत. आता त्यांचा वारसा राहुल गांधी चालवणार आहेत.

Anushka Sharma Birthday : विराटने दिली अनुष्का शर्माच्या बर्थेडेची पार्टी, आरसीबीच्या खेळाडूंनी केली धमाल, पाहा

फिरोज गांधी पहिल्यांदा आले होते निवडणूक

रायबरेली मतदार संघ हा कॉँग्रेसचा गढ मानला जातो. येथून फिरोज गांधी यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. १९५८ च्या निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. यानंतर इंदिरा गांधींचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांच्या तर त्यांच्या नंतर सोनिया गांधी येथून पाच वेळा खासदार झाल्या आहेत. आता राहुल गांधी हे वारसा सांभाळणार आहेत.

राहुल आपली आई सोनिया गांधी, बहीण प्रियंका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतरांसह येथील फुरसातगंज विमानतळावर विमानातून रायबरेलीत दाखल झाले. यावेळी जोरदार स्वागत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले. या जागेचा घोळ संपवून काँग्रेस पक्षाने आज सकाळी राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गांधी घराण्याचे जवळचे सहकारी किशोरी लाल शर्मा हे अमेठी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

घाबरू नका, पळूही नका; रायबरेलीतून निवडणूक लढण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेवर नरेंद्र मोदी यांचा टोला

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील पाचव्या टप्प्याचे मतदान हे २० मे रोजी होणार आहे. या साठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेसने १६ वेळा मिळवला विजय

काँग्रेस पक्षाने रायबरेली जिल्ह्यातील लोकसभेची जागा १६ वेळा जिंकली आहे. भारतीय जनता पक्षाचे अशोक सिंह हे दोनदा विजयी झाले आहेत. जनता पक्षाचे राजनारायण एकदा विजयी झाले आहेत. बसपा आणि सपाला अद्याप येथे खातेही उघडता आलेले नाही. सध्या येथील खासदार सोनिया गांधी आहेत.

कोण कधी जिंकले

१९५७ बैजनाथ कुरील, काँग्रेस

१९५७ फिरोज गांधी, काँग्रेस

१९६० आरपी सिंग, काँग्रेस

१९६२ बैजनाथ कुरील, काँग्रेस

१९६७ इंदिरा गांधी, काँग्रेस

१९७१ इंदिरा गांधी, काँग्रेस

१९७७ राजनारायण, जनता पक्ष

१९८० इंदिरा गांधी, काँग्रेस

१९८० अरुण नेहरू, काँग्रेस

१९८४ अरुण नेहरू, काँग्रेस

१९८९ शीला कौल, काँग्रेस

१९९१ शीला कौल, काँग्रेस

१९९६ अशोक कुमार सिंग, भाजप

१९९८ अशोक कुमार सिंग, भाजप

१९९९ कॅप्टन सतीश शर्मा, काँग्रेस

२००४ सोनिया गांधी, काँग्रेस

२००६ सोनिया गांधी, काँग्रेस

२००९ सोनिया गांधी, काँग्रेस

२०१४ सोनिया गांधी, काँग्रेस

पुढील बातम्या