Virgin Girls Pleasure Squad: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन दरवर्षी २५ व्हर्जिन मुलींशी लैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती उघड झाली असून या साठी खास प्लेजर स्क्वॉड चालवले जाते. या प्लेजर स्क्वॉड मधून पळून आलेल्या एका महिलेने अनेक गंभीर आरोप किम जोंग उनवर केले आहे. येओनमी पार्क असे पळून आलेल्या महिलेचे नाव असून पार्कने सांगितले की, उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनसाठी चालवण्यात येणाऱ्या या प्लेजर स्क्वॉडच्या पथकाचे ३ गट आहेत.
पहिल्या गटाला मसाजचे प्रशिक्षण दिले जाते, दुसऱ्या गटाला किम जोंग उन आणि त्याच्या जवळच्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नृत्य आणि गाण्याचे प्रशिक्षण या प्लेजर स्क्वॉड मधील मुलींना दिले जाते. धक्कादायक म्हणजे, किम जोंग उन हा दरवर्षी २५ व्हर्जिन मुलींशी लैंगिग समांध ठेवत असल्याचे देखील पार्कने सांगितले.
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनसोबत देश सोडून पळून आलेल्या येओनमी पार्कने अनेक गंभीर खुलासे केले आहेत. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, पार्कने सांगितले की किमकडे एक 'प्लेजर स्क्वाड' आहे, जिथे तो मुलींची निवड करतो आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतो. पार्कने सांगितले की, मुलींची निवड करण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांपासून ते त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सर्व गोष्टींची माहिती घेण्यात येते.
किम जोंग उन दरवर्षी २५ मुलींची प्लेजर स्क्वाडसाठी निवड करतो. त्या सर्व मुली कुमारिका म्हणजेच व्हर्जिन असतात. पार्कने सांगितले की, मुलींच्या या गटासाठी तिची दोनदा निवड झाली होती, पण 'कौटुंबिक स्थिती'मुळे तिला मान्यता मिळाली नाही. किम या प्लेजर स्क्वॉड मधील मुलींशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा खुलासा देखील तिने केला.
या प्लेजर स्क्वॉडसाठी सुंदर मुलींची निवड केली जाते. त्यांची निवड केल्यावर त्यांची कौटुंबिक स्थिती आणि राजकीय स्थिती याची माहिती घेतली जाते. जर मुलगी उत्तर कोरियातून पळून गेलेल्या कुटुंबातील असेल तर तिला हाकलून दिले जाते.डेली स्टारच्या हवाल्याने मिररच्या रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की मुलींच्या निवड प्रक्रियेत वैद्यकीय तपासणीचाही समावेश आहे. ज्या मुली हे विविध टप्पे पार करतात त्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाते. या चाचणीत त्यांच्या शरीरावरील अगदी लहान जखमांचीही तपासणी केली जाते. रिपोर्ट्सनुसार, जर मुलींच्या शरीरावर मार्क असेल तर मुलगी अपात्र ठरू शकते.
वृत्तपत्राशी बोलताना पार्क म्हणाले की, उत्तर कोरियाच्या प्लेजर स्क्वॉडच्या पथकाचे तीन गट आहेत. पहिल्या गटाला मसाजचे प्रशिक्षण दिले जाते, दुसऱ्या गटाला किम जोंग उन आणि त्याच्या जवळच्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी नृत्य आणि गाण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुलींचा तिसरा गट शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी राखीव ठेवला जातो.
पार्क म्हणाली, 'त्यांना हुकूमशहा आणि इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतात. पुरुषांना खूष ठेवणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. अहवालानुसार, किमने सर्वात सुंदर मुली स्वतःसाठी ठेवल्या आणि इतरांना खालच्या दर्जाच्या कमी सुंदर मुली लष्करातील जनरल आणि नेत्यांसाठी राखीव ठेवल्या.
अहवालानुसार, उत्तर कोरियातील परिस्थिती पाहता अनेक वेळा पालक आपल्या मुलींना प्लेजर स्क्वॉडमध्ये सामील होण्यासाठी संमती देतात. उत्तर कोरियात अन्नाचा तुडवडा असल्याने स्वतःला भुकेपासून वाचवण्याचा एक मार्ग म्हणून स्वत:च्या मुलींना पालक या प्लेजर स्क्वॉडमध्ये पाठवतात. असे म्हटले जाते की जेव्हा पथकातील सदस्यांचे वय २०-३० वर्षांच्या दरम्यान असते, तेव्हा त्यांचे सहसा एका अंगरक्षकाशी लग्न केले जाते. सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी एक म्हणून सेवानिवृत्त होण्यासाठी पथकातील सदस्यांची निवड हा विशेषाधिकार असल्याचा दावा पळून आलेल्या पार्कने केला आहे.
संबंधित बातम्या