मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Narendra Modi : दहा वर्षांत पहिल्यांदाच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; वर्धा येथे आज जाहीर सभा

Narendra Modi : दहा वर्षांत पहिल्यांदाच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; वर्धा येथे आज जाहीर सभा

Apr 19, 2024, 10:55 AM IST

  • PM Modi campaign in Vidarbha lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथून फोडणार आहे. वर्धा येथे विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आज मोदी करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र ठोकणार मुक्काम; वर्धा येथे आज जाहीर सभा होणार आहे.

PM Modi campaign in Vidarbha lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथून फोडणार आहे. वर्धा येथे विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आज मोदी करणार आहेत.

  • PM Modi campaign in Vidarbha lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथून फोडणार आहे. वर्धा येथे विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आज मोदी करणार आहेत.

PM Modi campaign in Vidarbha loksabha election 2024 : देशात आज लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात पुर्व विदर्भातील पाच मतदार संघात मतदान सुरू आहे. तर देशात १०२ मतदार संघासाठी मतदान सुरू आहे. यानंतर विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा नारळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फोडला जाणार आहे. आज १९ एप्रिलला वर्धा येथील तळेगाव येथे ५.१५ वाजता त्यांची सभा होणार आहे. या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दिवसांचा मुक्काम नागपूर येथे करणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून तब्बल १० वर्षांनंतर मोदी हे पहिल्यांदाच राज्यात मुक्कामी थांबणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fake Voting : उत्तर प्रदेशमध्ये बोगस मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ; २५ मे रोजी होणार फेरमतदान

Thackeray Vs BJP : कुलाब्यात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी

Lok Sabha Election 2024 : मुंबईत सायंकाळी ६ वाजल्यानंतरही मतदान करता येणार! पण आहे एक अट..

Uddhav Thackeray : पहाटे सूर्योदयापर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Loksabha Election first phase voting live : देशात मतदानाला शांततेत सुरूवात! अनेक दिग्गजांनी बजावला हक्क

राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, रामटेक, नागपूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २६ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी या पूर्वी सभा घेतली आहे. तर रामटेक येथेही त्यांची सभा या पूर्वी झाली आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा येथे येणार आहे.

Loksabha Election : गडकरी, बालियान, चिदंबरम यांच्यासह तब्बल १५ बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये आज होणार कैद

वर्धा येथे तळेगाव येथे त्यांची सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच मोदी यांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात येणार आहे. वर्धा येथून विद्यमान खासदार रामदास तडस हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर अमरावती येथून नवनीत राणा या उभ्या आहेत. विदर्भातील भाजपच्या इतर उमेदवारांच्या प्रचाराठी मोदी हे विदर्भात सभा घेणार आहे. वर्धा येथील सभा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० एप्रिल रोजी देखील राज्यात सभा होणार आहेत परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे होणाऱ्या सभांना पंतप्रधान मोदी हे संबोधित करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे.

पंतप्रधान झाल्यावर नागपूरमध्ये पहिल्यांदा मुक्कामी थांबणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज १९ एप्रिलला वर्धा येथील सभा झाल्यावर २० तारखेला देखील सभा आहेत. १९ सभा झाल्यावर ते नागपूर येथे मुक्कामी थांबणार आहेत. वर्धा येथे भाजपचे रामदास तडस उमेदवार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा मोदी हे नागपूरला मुक्कामी थांबणार आहेत. गेल्या काही दिवसांतील मोदी यांचा हा दुसरा विदर्भ दौरा असेल. त्यांनी सर्वप्रथम चंद्रपूर येथे सभेला संबोधित केले होते. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा झाली.

पुढील बातम्या