मराठी बातम्या  /  निवडणुका  /  raebareli : राहुल गांधी यांना काँग्रेसनं रायबरेलीतून का उतरवलं? काय आहे यामागचं राजकीय गणित?

raebareli : राहुल गांधी यांना काँग्रेसनं रायबरेलीतून का उतरवलं? काय आहे यामागचं राजकीय गणित?

May 03, 2024, 11:46 AM IST

  • Rahul Gandhi from RaeBareli : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी ऐवजी रायबरेली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊया…

Explained : राहुल गांधी यांना काँग्रेसनं रायबरेलीतून का उतरवलं? काय आहे यामागचं राजकीय गणित?

Rahul Gandhi from RaeBareli : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी ऐवजी रायबरेली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊया…

  • Rahul Gandhi from RaeBareli : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी ऐवजी रायबरेली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊया…

Rahul Gandhi to contest from Raebareli : लोकसभा निवडणूक जाहीर होऊन महिना उलटल्यानंतरही काँग्रेसनं अमेठी आणि रायबरेली या पारंपरिक बालेकिल्ल्यातील उमेदवार जाहीर न केल्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. अखेर काँग्रेसनं राहुल यांना अमेठी ऐवजी रायबरेली मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. अमेठी हा मतदारसंघ सोडून राहुल यांनी रायबरेली का निवडला, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

J P Nadda On Rss : भाजप आता सक्षम, आरएसएसची गरज नाही! भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा मोठा दावा

भाजपला जिथे पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जातेय; उद्धव ठाकरेंचा आरोप

Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

रायबरेलीतून निवडणूक लढवणारे राहुल हे गांधी कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. याआधी त्यांचे आजोबा फिरोज गांधी, आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी इथून निवडणूक लढवली होती. आता राहुल हे रायबरेलीचं प्रतिनिधित्व करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं त्यांची उमेदवारी जाहीर केली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठीत स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. मात्र, त्यावेळी ते केरळच्या वायनाडमधून विजयी होऊन संसदेत पोहोचले होते. यावेळी ते पराभवाचा वचपा काढणार का, याकडं सर्वांचं लक्ष होतं. मात्र, त्यांनी अमेठीतून लढणं टाळलं आहे. तिथं काँग्रेसनं किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

रायबरेलीतून निवडणूक का?

गांधी कुटुंब १९५२ पासून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करत आलं आहे. फिरोज गांधी यांनी १९५२ आणि १९५७ मध्ये ही जागा जिंकली. इंदिरा गांधी १९६७ ते १९७७ या काळात रायबरेलीच्या खासदार होत्या. आणीबाणीनंतर १९७७ च्या निवडणुकीत राज नारायण यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्या १९८० मध्ये संसदेत परतल्या. इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये रायबरेली जिंकली आणि अविभाजित आंध्र प्रदेशातील मेडक ही दुसरी जागाही कायम राखली. २००४ पासून सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार होत्या. जवळचे नातेवाईक अरुण नेहरू आणि शीला कौल यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.

काँग्रेस रणनीतीकारांनी राहुल गांधी यांना गांधी घराण्याची जागा असलेल्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आणि अमेठीत प्रियांका गांधी वाड्रा यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी टक्कर देण्याचा सल्ला दिला होता, असं सूत्रांकडून समजतं. मात्र, देशभरात पक्षाचा प्रचार करण्याचं कारण देत प्रियांका गांधी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं समजतं. त्यांनी पहिल्यांदाच व्यापक भूमिका स्वीकारली आहे.

गांधींसाठी सर्वात सुरक्षित जागा

अमेठी या दुसऱ्या कौटुंबिक बालेकिल्ल्याच्या तुलनेत रायबरेलीची जागा सुरक्षित आहे. राहुल गांधी यांना अमेठीमध्ये निकराची लढत द्यावी लागली असती. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील इतर जागांवर पराभव होत असताना सोनिया गांधी यांना रायबरेलीमध्ये ५५.८ मतं मिळाली होती.

उत्तर-दक्षिण समतोल

सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर काँग्रेसला उत्तर भारताचं प्रतिनिधित्व करणारा एक प्रमुख नेता असणं आवश्यक आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (कर्नाटक), सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल (केरळ) आणि मुख्य प्रवक्ते जयराम रमेश (कर्नाटक) हे दक्षिणेतील आहेत. उत्तर भारतातून आपल्या प्रमुख नेत्याला उमेदवारी देणं राजकीयदृष्ट्या शहाणपणाचं होतं.

दक्षिण भारतात काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये, विशेषत: ज्या सहा राज्यांमध्ये भाजपशी थेट लढत आहे, तिथं पक्षाला पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर जागांचा आकडा सुधारणं आवश्यक आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगण या दोन राज्यांत काँग्रेसनं विजय मिळवला, पण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली. उत्तर भारतात काँग्रेस केवळ हिमाचल प्रदेशात सत्तेत असून झारखंडमधील सत्ताधारी आघाडीचा भाग आहे.

किशोरीलाल शर्मा यांचं महत्त्व

प्रियांका गांधी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काँग्रेसकडून अमेठीसाठी योग्य उमेदवाराचा शोध सुरू होता. शर्मा हे अनेक दशकं गांधी कुटुंबासाठी अमेठी आणि रायबरेलीची जबाबदारी सांभाळत होते, असं एका काँग्रेस नेत्यानं सांगितलं.

माजी खासदार शीला कौल यांच्या नातवाला अमेठीतून उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार होता. मात्र, गांधी कुटुंबाशी निष्ठावंत शर्मा यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यापैकी कोणीही निवडणूक लढवेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असतानाच इराणी यांच्याविरोधात शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुढील बातम्या