sushma andhare : ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; थोडक्यात बचावल्या-sushma andhare helicopter crash near mahad maharashtra ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sushma andhare : ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; थोडक्यात बचावल्या

sushma andhare : ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; थोडक्यात बचावल्या

May 03, 2024 11:17 AM IST

sushma andhare helicopter crash : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर महाड येथे क्रॅश झाले आहे. या अपघातात अंधारे या थोडक्यात बचावल्या आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश! थोडक्यात बचावल्या
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश! थोडक्यात बचावल्या

sushma andhare helicopter crash : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर महाड येथे क्रॅश झाले आहे. या अपघातात अंधारे या थोडक्यात बचावल्या आहेत. अंधारे यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. ही घटना महाड येथे घडली असून सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीदेखील जोरदार सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणांनी विरोधकांना जेरीस आणले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार दौऱ्यासाठी त्या जात असतांना महाड येथे त्यांचे हेलीकॉप्टर आज सकाळी क्रॅश झाले. या अपघातातून अंधारे या थोडक्यात बचवल्या आहेत. त्यांना किरकोळ मार लागला आहे. हेलिकॉप्टर उडवणारे दोन पायलट देखील बचावले आहे. दरम्यान हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.  

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

अंधारे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड आला. यामुळे पायलटने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लॅंडींग करण्याचा निर्णय घेतला. हे हेलिकॉप्टर हवेतच हेलकावे खात असतांना खाली उतरवण्यात आले. यावेळी हे जोरदार जमिनीवर येऊन धडकले. ही संपूर्ण घटना व्हिडिओ मध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे.

सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी ९.३०  वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या . बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत.

हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्येच आहे. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक

सुषमा दगडू अंधारे या पेशानं एक वकील आहेत. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी व स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या २०२२ च्या दसरा मेळाव्यानंतर त्या चर्चेत आल्या. या मेळाव्यात त्यांनी आक्रमक शैलीत भाषण केले होते. सध्या त्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.

Whats_app_banner