मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Solapur Loksabha :'बीडचं पार्सल परत पाठवूया'; सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंचा खोचक टोला

Solapur Loksabha :'बीडचं पार्सल परत पाठवूया'; सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंचा खोचक टोला

Mar 25, 2024, 06:59 PM IST

  • Praniti Shonde Vs Ram Satpute : प्रणिती शिंदे समर्थकांकडून सातपुते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. त्यात 'चला लागा कामाला, बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया' अशा पोस्ट केल्या जात आहे.

सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंचा खोचक टोला

Praniti Shonde Vs Ram Satpute : प्रणिती शिंदे समर्थकांकडून सातपुते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. त्यात'चला लागा कामाला,बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया'अशा पोस्ट केल्या जात आहे.

  • Praniti Shonde Vs Ram Satpute : प्रणिती शिंदे समर्थकांकडून सातपुते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. त्यात 'चला लागा कामाला, बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया' अशा पोस्ट केल्या जात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे व भाजपचे राम शिंदे यांच्या लढत होणार आहे. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीनंतर भाजपनेही येथे तरुण चेहरा दिला आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन युवा आमदारांमध्ये लढत होणारअसून आतापासूनच टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सोलापूरची लेक म्हणून तुमचे स्वागत करते, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची निवडणूक 'भूमिपुत्र विरुद्ध उपरे' अशी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narendra Modi : काँग्रेस सत्तेत आली तर राम मंदिरावर बुलडोझर चालवेल; नरेंद्र मोदी यांनी वाढवली प्रचाराची धार

Ujjwal Nikam : सरकारी कोट्यातून मुंबईत घर घेऊनही उज्ज्वल निकम हॉटेलात राहायचे; १७ लाख रुपयांचे बिल लावले?

Mumbai: राजकीय पक्ष करणार आज जिवाची मुंबई! शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकत्र, तर बीकेसीत इंडिया आघाडीची सभा

Uddhav Thackeray : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, उद्धव ठाकरेंचा भरपावसात हल्लाबोल

राम सातपुते यांना भाजपकडून रविवारी उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आमदार राम सातपुते यांना खोचक टोला लगावला आहे.'आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते,  मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला आहे.

प्रणिती शिंदे यांच्या पोस्टनंतर त्यांचे समर्थकही सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. सातपुते यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. त्यात 'चला लागा कामाला, बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया' अशा पोस्ट केल्या जात आहे.

प्रणिती शिंदे यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले आहे, लोकसभेच्या प्रचार काळात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून,लोकशाहीचा आदर करत, विचारांची लढाई लढू. समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढू.

कोण आहेत राम सातपुते –

राम सातपुते हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. सातपुते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबर ते भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. २०१९ मध्ये ते पहिल्यादांच आमदार झाले आहेत.

आडम मास्तर करणार काँग्रेसचा प्रचार -

दरम्यान लोकसभा निवडणुकांसाठी सोलापुरातील कामगारे नेते आडम मास्तर यांनीहीआपली भूमिका स्पष्ट करत आपण काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. आडम मास्तरांच्या ड्रीम प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदी सोलापुरात आले होते. त्या कार्यक्रमातआडम मास्तरांनी मोदींच्या नेतृत्वाचं तोंडभरून कौतुक केलं होतं.

आडम मास्तर यांनी म्हटले की, आम्ही प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली असली तरी भाजप आमचा मुख्य विरोधक आहे. त्यांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करू. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीपुढे एक प्रस्ताव ठेलला आहे. त्यानुसार, सोलापूर मध्य विधानसभेची जागा महाविकास आघाडीने त्यांना सोडण्याची मागणी केली आहे.

पुढील बातम्या