मराठी बातम्या  /  निवडणुका  /  सोलापुरात लेटर वॉर! ‘उपरा’ म्हणून डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं प्रत्युत्तर; म्हणाले पराभूत आणि खचलेली..."

सोलापुरात लेटर वॉर! ‘उपरा’ म्हणून डिवचणाऱ्या प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं प्रत्युत्तर; म्हणाले पराभूत आणि खचलेली..."

Mar 25, 2024, 07:45 PM IST

  • Solapur Lok Sabha Constituency : प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांनी देखील उलट पत्र लिहित उत्तर दिले आहे. सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये होणारी युवा लढत रंगतदार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.

प्रणिती शिंदेंना राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

Solapur Lok Sabha Constituency : प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांनी देखील उलट पत्र लिहित उत्तर दिले आहे. सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय,असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये होणारी युवा लढत रंगतदार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.

  • Solapur Lok Sabha Constituency : प्रणिती शिंदे यांच्या पत्राला राम सातपुते यांनी देखील उलट पत्र लिहित उत्तर दिले आहे. सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये होणारी युवा लढत रंगतदार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.

भाजपने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करत सोलापुरातून अनपेक्षितपणे माळशिरसचे आमदार राम सातपुतेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे आता सोलापूर मतदारसंघात राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या रुपाने तरुण लढत होणार आहे. त्यातच आता दोन्ही उमेदवारांमध्ये सोशल मीडियावर लेटर वॉर रंगले आहे. राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी एक्सवर पत्र पोस्ट करत राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला राम सातपुतेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना; अन् शरद पवार यांच्याबाबत म्हणाले...

Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

Mumbai North Loksabha: उत्तर मुंबई मतदारसंघ ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; मीच जायंट किलर ठरणार: भूषण पाटील

राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदेंना उलट पत्र लिहित सोलापूरच्या जनतेने चांगलंच ओळखलंय, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये होणारी युवा लढत रंगतदार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.

भाजपकडून राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदेंनी आमदार राम सातपुते यांना खोचक टोला लगावला आहे. प्रणिती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणले आहे की, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला आहे.

यावरराम सातपुतेयांनी पत्रातूनच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.जर पक्षाच्या एकेकाळच्या अध्यक्षा इटलीहून आलेल्या चालल्या, राहुल गांधी वायनाडमध्ये जाऊन निवडणूक लढवलेले चालते. भारतीय जनता पार्टीचा विजय आणि या लोकांचा पराभव होताना दिसतोय. ही खचलेली मानसिकता आहे. पुन्हा एकदा सोलापुरात भाजप विजयाची हॅट्रीक करेलअसा टोला सातपुतेंनी लगावला.

राम सातपुतेंनी म्हटले की,मी२०१९पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतआहे.आमदार झाल्यापासून मतदारसंघातील जनतेच्या सेवेत प्रामाणिकपणेविकासकामेकरण्याचा प्रयत्न करतोय. मी भाजपचा कार्यकर्ता असून हा पक्ष समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवतआहे.समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय,हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय.

 

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना एका ऊसतोड मजुराच्याकुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. असं पत्र सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना पाठवलं.

पुढील बातम्या