मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Piyush Goyal news : पियूष गोयल यांना मुंबईतून भाजपची उमेदवारी; गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट

Piyush Goyal news : पियूष गोयल यांना मुंबईतून भाजपची उमेदवारी; गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट

Mar 13, 2024, 08:05 PM IST

  • BJP Lok Sabha Candidates 2nd List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुंबईतील दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला असून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

पियूष गोयल यांना मुंबईतून उमेदवारी; गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट

BJP Lok Sabha Candidates 2nd List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुंबईतील दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला असून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • BJP Lok Sabha Candidates 2nd List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुंबईतील दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला असून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Mumbai Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईतील दोन खासदारांचा पत्ता कट करण्यात आला असून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा यांंना संधी देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

मुंबईत सध्या भाजपचे तीन खासदार आहेत. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईच्या जागेचा समावेश आहे. त्यापैकी उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. उत्तर मध्य मुंबईतून सध्या पूनम महाजन लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यांचंही तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे. मात्र, दुसऱ्या यादीत या मतदारसंघाचा उल्लेख नसल्यानं महाजन यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे.

महाविकास आघाडीमधील जागावाटपात उत्तर मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. या मतदारसंघात पियूष गोयल यांना कोण टक्कर याविषयी उत्सुकता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी अनेक वर्षे उत्तर मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. अभिनेता गोविंदा यानंही उत्तर मुंबईचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं राम नाईक यांचा आश्चर्यकारक पराभव केला होता.

पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट

भाजपनं आज जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २० उमेदवारांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. तर, चंद्रपूरमधून राज्य सरकारमधील विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार पुढीलप्रमाणे

हिना गावित (नंदूरबार), सुभाष भामरे (धुळे), स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), नितीन गडकरी (नागपूर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), भारती पवार (दिंडोरी), कपिल पाटील (भिवंडी), पियूष गोयल (उत्तर मुंबई), मिहिर कोटेचा (ईशान्य मुंबई), मुरलीधर मोहोळ (पुणे), सुजय विखे-पाटील (अहमदनगर), पंकजा मुंडे (बीड), सुधाकर श्रृंगारे (लातूर), रणजीत निंबाळकर (माढा), संजय पाटील (सांगली).

 

 

 

पुढील बातम्या