मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Loksaba Election : लोकसभा निवडणुकीची भविष्यवाणी करत होता पोपट, पोलिसांनी ज्योतिषालाच उचललं

Loksaba Election : लोकसभा निवडणुकीची भविष्यवाणी करत होता पोपट, पोलिसांनी ज्योतिषालाच उचललं

Apr 10, 2024, 03:50 PM IST

  • Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक निकालाबाबत भविष्यवाणी करत असलेल्या पोपटाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तामिळनाडू राज्यातील आहे.

निवडणुकीची भविष्यवाणी करत होता पोपट, पोलिसांनी ज्योतिषाला केली अटक

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक निकालाबाबत भविष्यवाणी करत असलेल्या पोपटाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तामिळनाडू राज्यातील आहे.

  • Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक निकालाबाबत भविष्यवाणी करत असलेल्या पोपटाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तामिळनाडू राज्यातील आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता केवळ ९ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. संपूर्ण देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता निवडणूक निकालाबाबत भविष्यवाणी करत (Parrot was predicting elections) असलेल्या पोपटाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तामिळनाडू राज्यातील आहे. तेथे वन अधिकाऱ्यांनी पोपटांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. या पोपटाने  INDIA  आघाडीच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या PMK उमेदवाराच्या विजयाचा दावा केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपला जिथे पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जातेय; उद्धव ठाकरेंचा आरोप

Kanhaiya Kumar: प्रचारादरम्यान कन्हैया कुमारवर हल्ला; पुष्पहार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने कानशिलात लगावली!

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना; अन् शरद पवार यांच्याबाबत म्हणाले...

Raebareli : माझ्या मुलाला तुमच्याकडं सोपवतेय, त्याला प्रेम द्या; तो तुम्हाला कधीच निराश करणार नाही - सोनिया गांधी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोपटाने भविष्यवाणी केली होती की, तामिळनाडू राज्यातील कुड्डलोर लोकसभा मतदारसंघातून PMK चे उमेदवार थंकर बचन निवडणूक जिंकतील. विशेष म्हणजे  PMK तामिळनाडूमध्ये भाजपसोबत निवडूक लढत आहे. आता या भविष्यवाणीनंतर ज्योतिषाला पक्ष्याला बंदिस्त करून ठेवल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. 

फॉरेस्ट रेंजर जे. रमेश यांनी दावा केला आहे की, पोपटाला Wildlife (Protection) Act  नुसार  Schedule II species मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या पक्ष्याला कैद करून ठेवणे गुन्हा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याला दंड आकारून व वॉर्निंग देऊन सोडले जाऊ शकते. दंडाची रक्कम १० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. PMK प्रमुख अंबुमणि रामदास यांनी म्हटले की, ही कारवाई डीएमकेच्या संभाव्य पराभवाचे लक्षण आहे.

भाजपला दक्षिणेत मिळू शकते आघाडी - 
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे दावे मान्य करत म्हटले की, केंद्रातील ही सत्ताधारी पार्टी दक्षिण आणि पूर्व भारतात आपल्या जागा व मतांच्या टक्केवारीत वृद्धी करेल. किशोर यांनी म्हटले की, भाजप तेलंगाणात पहिला किंवा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा पक्ष ठरेल. त्याचबरोबर ओडिशामध्ये १ नंबरचा पक्ष ठरेल.  त्याचबरोबर त्यांनी दावा केला की, अनेकांना आश्चर्य वाटेल की, पश्चिम बंगालमध्येही भाजप पहिल्या क्रमाकांचा पक्ष बनणार आहे. त्यांनी म्हटले की, तामिळनाडूमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यात पोहोचेल. 

तेलंगाना, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २०४ जागा आहेत. मात्र २०१४ व २०१९ मध्ये भाजप या राज्यांत ५० जागांही जिंकू शकलेली नाही. भाजपने २०१४ मध्ये २९ तर २०१९ मध्ये ४७ जागांवर विजय मिळवला होता. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागांसाठी मतदान होत आहे.

पुढील बातम्या