मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray Trolled: क्या नेता बनेगा रे तू; भाजपला पाठिंबा देताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ट्रोल

Raj Thackeray Trolled: क्या नेता बनेगा रे तू; भाजपला पाठिंबा देताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ट्रोल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 10, 2024 12:22 PM IST

MNS President Raj Thackeray Trolled: महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे असल्याचे राज ठाकरेंनी घोषणा करताच राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

मनसे पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
मनसे पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. (Hindustan Times)

MNS Gudi Padwa Melava 2024: गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे, असे सांगणारे मी पहिले व्यक्ती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. मात्र, यानंतर राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. "भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी च्या महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बिनशर्त पाठिंबा आहे. हा पाठिंबा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए आघाडीला आहे. आता सर्वांनी निवडणुकीची तयारी करावी", असे राज ठाकरे म्हणाले.

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना दिलासा; उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुख्यमंत्र्यांनी मानले राज ठाकरेंचे आभार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ताधारी आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. महायुती मनसेला लोकसभेच्या जागा लढवणार का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने तीन पक्षांच्या आघाडीला पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही अटी घातल्या नाहीत.

Raj Thackeray Speech: शिवसेनेचं प्रमुखपद ते भाजपकडून ‘कमळ’चा प्रस्ताव, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

विजय वडेट्टीवार यांची राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरे जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते भाजपसोबत जाणार हे स्पष्ट झाले होते. पण एवढ्या लवकर वाघाचे कोकरूत रुपांतर होईल, असे आम्हाला वाटले नव्हते. राज ठाकरेंसारखा लढवय्ये गुलाम होणार का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Raigad Crime : टॉवेलने तोंड दाबून आईने घेतला पोटच्या २ मुलांचा जीव! प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केलं भयंकर कृत्य

राज ठाकरेंच्या निर्णयावर मनसे पदाधिकारी नाराज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेताच मनसेमध्ये गळतीला सुरूवात झाली. ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हा निर्णय होऊन काही तास होत नाही तोच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात केली आहे.

WhatsApp channel

विभाग