मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Pragya Singh Thakur : 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

Pragya Singh Thakur : 'मोदीजींना माझे शब्द आवडले नसावेत', तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

Mar 03, 2024, 09:23 PM IST

  • Pragya Singh Thakur On Modi : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha  election 2024 )भाजपने तिकीट का दिले नाही, यावर प्रश्न विचारताच प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या मी कदाचित काही शब्द बोलले असतील जे मोदींना आवडले नसतील.

प्रज्ञा सिंह ठाकूर

Pragya Singh Thakur On Modi : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election2024 )भाजपने तिकीट का दिले नाही, यावर प्रश्न विचारताच प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या मी कदाचित काही शब्द बोलले असतील जे मोदींना आवडले नसतील.

  • Pragya Singh Thakur On Modi : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha  election 2024 )भाजपने तिकीट का दिले नाही, यावर प्रश्न विचारताच प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या मी कदाचित काही शब्द बोलले असतील जे मोदींना आवडले नसतील.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election 2024 ) भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची पहिली यादी (bjp candidate list) जाहीर केली आहे. भाजपने पक्षाच्या ३४ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील  भोपाळ मतदारसंघाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर (pragya singh thakur) नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. तुमचे तिकीट का कापले? या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, मी अशा काही शब्दांचा वापर केला आहे, कदाचित ते मोदीजींना पसंत आले नसावेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भाजपला जिथे पराभव दिसतोय, तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जातेय; उद्धव ठाकरेंचा आरोप

भाजपने शनिवारी १९५ उमेदवारांची पहिली लिस्ट जाहीर केली होती. भोपाळ मतदारसंघातून यावेळी आलोक शर्मा यांनी तिकीट दिले आहे. पक्षाने मध्य प्रदेशमधील २९ जागांपैकी २४ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातील दोन विद्यमान खासदार भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर  आणि गुना येथून केपी शर्मा यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढतील.

मी आधीही तिकीट मागितले नाही, आताही मागणार नाही -

प्रज्ञा ठाकूर यांना विचारले गेले की, अखेर पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकासाठी त्यांना तिकीट का दिले नाही? त्यांनी सांगितले की, हा पक्षाचा निर्णय आहे. यामध्ये याचा विचार करू नये की, तिकीट का दिले नाही, कशामुळे तिकीट कापले. मी आधीही तिकीट मागितले नव्हते व आताही मागणार नाही.

मोदी म्हणाले होते, प्रज्ञा ठाकूरला माफ करणार नाही -

प्रज्ञा ठाकूर यांच्यावर पंतप्रधान मोदी नाराज होते. त्यांनी महात्मा गांधी यांचे खुनी नथूराम गोडसे याला खरा देशभक्त म्हटले होते. यावर मोदी म्हणाले की, ते प्रज्ञा ठाकूरला कधीही माफ करणार नाहीत. मोदी म्हणाले होते की, गोडसेविषयीच्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागितली आहे, मात्र महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला मी कधीही माफ करू शकणार नाही.

यावर प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, होऊ शकते की, मी अशा काही शब्दाचा वापर केला, जे मोदींना पसंत आले नाहीत. त्यांनी म्हटले होते की, मला माफ करणार नाहीत. मात्र मी त्यासाठी आधीच माफी मागितली होती. माझे सत्या बोलणे विरोधक व काँग्रेसला खटकते व ते माझ्या आडून मोदींवर प्रहार करतात.

पुढील बातम्या