Lok Sabha Elections BJP Candidates : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अनेक राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत असतांना शनिवारी मात्र, भाजपने आघाडी घेत त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली आहे. १९५ जणांच्या या यादीत अनेक दिग्गजांना संधि देण्यात आली आहे तर अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. यमुळे उलट सुटल चर्चा सुरू झाल्या आहे. या यादीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याशिवाय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.
भाजपतर्फे लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व नेत्यांना निवडणूक तयारीच्या सूचना देखील गेल्या आहेत. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या १९५ उमेदवारांच्या यादीत अनेक केंद्रीय मंत्र्यांची नवे आहेत. मात्र, कामे करण्यात आघाडीचे असणाऱ्या नितीन गडकरी यांना या पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याशिवाय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही तिकीट दिलेलं नाही.
दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून तिकीट देण्यात आले आहे. तर अमित शाह हे गंडिनगर येथून निवडणूक लढवणार आहे. राजनाथ सिंह हे लखनौ, स्मृती इराणी या अमेठीतून, किरेन रिजिजू अरुणाचल पूर्व येथून, राजीव चंद्रशेखर तिरुवनंतपुरम येथून ज्योतिरादित्य सिंधिया गुना येथून तर भूपेंद्र यादव अलवर येथून गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर येथून, सर्बानंद सोनोवाल दिब्रुगढ येथून, संजीव बालिया मुझफ्फरनगर येथून अर्जुन मुंडा खुंटी येथून, अर्जुन राम मेघवाल हे बिकानेर येथून परषोत्तम रुपाला हे राजकोट येथून, मनसुख मांडविया हे पोरबंदर येथून, देवुसिंह चौहान हे खेडा येथून, कैलास चौधरी हे बारमेर येथून, जितेंद्र सिंह हे उधमपूर येथून, अन्नपूर्णा देवी या कोडरमा येथून, जी किशन रेड्डी हे सिकंदराबाद येथून, फग्गनसिंह कुलस्ते हे मांडला येथून, विरेंद्र खाटीक हे टिकमगड येथून, व्ही मुरलीधरन हे अटिंगल येथून, सत्यपाल बघेल हे आग्रा येथून, अजय मिश्रा टेनी हे खेरी येथून, कौशल किशोर हे मोहनलालगंज येथून, भानुप्रताप वर्मा हे जालौन एहतून, साध्वी निरंजन ज्योती या फतेहपूर येथून, पंकज चौधरी हे महाराजगंज येथून, निशिथ प्रामाणिक हे कूच बिहार येथून, शंतनू ठाकूर हे बनगाव येथून तर सुभाष सरकार यांना बांकुडा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
तर या यादीत नितीन गडकरी, भागवत कराड, भारती पवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार, अनुराग ठाकूर, निर्मला सीतारामण, एस. जयशंकर, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, गिरीराज सिंह, राजकुमार सिंह, हरदीप सिंग पुरी, राव इंद्रजित सिंह, अश्विनी चौबे, व्ही के सिंह, कृष्णपाल, नित्यानंद राय, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, दर्शना जरदोष, मीनाक्षी लेखी, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, ए नारायणस्वामी, अजय भट्ट, भगवंत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, सुभाष सरकार, राजकुमार रंजन सिंह, बिश्वेश्वर तोडू, एम. महेंद्रभाई, जॉन बार्ला, एल मुरुगन यांची नावे वगळण्यात आली आहे.