मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ramdas Tadas : भाजपचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस अडचणीत, सुनेनं केले गंभीर आरोप

Ramdas Tadas : भाजपचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस अडचणीत, सुनेनं केले गंभीर आरोप

Apr 11, 2024, 02:33 PM IST

  • Sushma Andhare allegations on Ramdas Tadas : वर्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस हिनं गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पूजा यांनी आपली व्यथा मांडली.

भाजपचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस अडचणीत, सुनेनं केलेले गंभीर आरोप

Sushma Andhare allegations on Ramdas Tadas : वर्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस हिनं गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पूजा यांनी आपली व्यथा मांडली.

  • Sushma Andhare allegations on Ramdas Tadas : वर्धा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर सून पूजा तडस हिनं गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पूजा यांनी आपली व्यथा मांडली.

Pooja Tadas allegations on Ramdas Tadas : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रामदास तडस हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. रामदास तडस यांच्यावर त्याची सून पूजा तडस यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझे सासरे व त्यांच्या मुलानं माझा छळ केला. माझ्याकडं मुलाच्या बापाचे पुरावे मागितले, असा आरोप पूजा तडस यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात राज्यात ५४.३३ तर देशात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; मतदानाचा टक्का घटला

Fake Voting : उत्तर प्रदेशमध्ये बोगस मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ; २५ मे रोजी होणार फेरमतदान

Thackeray Vs BJP : कुलाब्यात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी

Lok Sabha Election 2024 : मुंबईत सायंकाळी ६ वाजल्यानंतरही मतदान करता येणार! पण आहे एक अट..

शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज पूजा तडस यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतली. रामदास तडस यांच्या मुलानं पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी पूजा यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांना एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं. नंतर त्यांची काय अवस्था झाली याची साधी चौकशीही केली नाही. पूजाला केवळ उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. ती ज्या फ्लॅटवर राहत होती, तो फ्लॅट विकून टाकला गेला. ज्यांनी फ्लॅट घेतला त्यांनी पूजाला बाहेर काढलं. तिला एक मूल आहे. आता त्याच्या पालनपोषणाचा प्रश्न उभा राहिला आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

स्वत:चा परिवार सोडून ‘मोदी का परिवार’ म्हणून मिरवतात!

सुषमा अंधारे यांनी यावेळी रामदास तडस आणि पूजा यांच्या लग्नाचं प्रमाणपत्रही दाखवलं. लग्न करून जे आपला परिवार सोडून देतात, ते 'मोदी का परिवार' म्हणून मिरवतात हे फार चमत्कारिक आणि भयंकर आहे,' असा टोला सुषमा अंधारे यांनी हाणला.

आम्ही सुनेला न्याय दिला आहे असं रामदास तडस सांगतात. ते घर आता सुनेकडं नाही. उलट तिथून तिला ओढून बाहेर काढलं जातं. ती दाद मागायला गेली तरी तिला कार्यालयातून बाहेर काढलं जातं. खासदार रामदास तडस यांनी पूजाच्या वडिलांसमोर तिच्या बाळाच्या जन्माचे पुरावे मागितले, असा आरोपही अंधारे यांनी केला. एका चिमुकल्याला घेऊन आज ती माऊली न्याय मागते आहे, आता तरी तिला न्याय मिळेल का, असा सवाल अंधारे यांनी केला. पूजा तडस यांनी देखील यावेळी त्यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचला.

रामदास तडस यांनी फेटाळले आरोप

भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी सुषमा अंधारे व पूजा तडस हिचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या मुलानं आणि पूजानं परस्पर लग्न केलं होतं. ते दोघे एकत्र राहत होते. त्यानंतर त्यांच्यातच वाद सुरू झाला. पूजा ही काही लोकांच्या सांगण्यावरून मला ब्लॅकमेल करत होती. मी त्यास बळी पडलो नसल्यानं आता निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण उकरून काढलं जात आहे, असं तडस यांनी सांगितलं.

पूजा तडस अपक्ष निवडणूक लढणार

सासऱ्यावर आरोप करणाऱ्या पूजा तडस (शेंदरे) वर्धा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळं सासरा विरुद्ध सून असा रंगही इथल्या निवडणुकीला येणार आहे.

पुढील बातम्या