मराठी बातम्या  /  निवडणुका  /  A K Antony : निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे; माजी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली अजब इच्छा

A K Antony : निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे; माजी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली अजब इच्छा

Apr 10, 2024, 09:19 AM IST

    • AK Antony on son Anil Antony : काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी त्यांचा मुलगा अनिल अँटनी याचा पराभव व्हावा अशी मनीषा व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये जाणे चुकीचे असल्याचे देखील ते म्हणाले.
माझ्या मुलाचा प्रभाव व्हावा! काँग्रेस नेत्याने भर पत्रकार परिषदेत केली मनीषा व्यक्त

AK Antony on son Anil Antony : काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी त्यांचा मुलगा अनिल अँटनी याचा पराभव व्हावा अशी मनीषा व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये जाणे चुकीचे असल्याचे देखील ते म्हणाले.

    • AK Antony on son Anil Antony : काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी त्यांचा मुलगा अनिल अँटनी याचा पराभव व्हावा अशी मनीषा व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये जाणे चुकीचे असल्याचे देखील ते म्हणाले.

AK Antony says son Anil Antony : काँग्रेस जेष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांचा मुलगा आणि भाजप उमेदवार अनिल अँटोनी केरळमधील पाथनमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून पराभूत व्हावा अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली आहे. ऐवढेच नाही तर काँग्रेस नेत्यांच्या अथवा कार्यकर्त्यांच्या  मुलांची भाजपमध्ये जाऊ नये असे देखील अँटनी म्हणाले. अनिल ऐवजी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅन्टो अ‍ॅन्टोनी यांचा विजय होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Priyanka Gandhi interview: 'देशभरात भाजपविरोधात लाट; मोदींनी कॉंग्रेसचा जाहीरनामा वाचून बोलावेः प्रियांका गांधी

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Cong manifesto fake Post: काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसरवली, गोव्यातील एका व्यक्तीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

chhattisgarh accident : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस ५० फूट खोल खाणीत पडली, १५ ठार १६ जखमी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल के. अँटनी हे भाजपच्या तिकिटावर केरळमधील पठाणमथिट्टा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. या मुळे अँटनी यांना अनेकांनी प्रश्न विचारले होते. यावर उत्तर देतांना अँटनी यांनी वरील विधान केले.

ए. के. अ‍ॅन्टोनी पत्रकार परिषदेत म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कृत्य चुकीचे आहे. काँग्रेस हा माझा धर्म आहे. माझा मुलगा अनिल यांचा पराभव झाला पाहिजे व काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅन्टो अँटनी हे विजयी होणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रीय प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याच्या केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या आरोपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अँटनी म्हणाले, "काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी सतत मोदी, भाजप आणि आरएसएस विरुद्ध लढत आहेत. मला वाटत नाही की जनता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेईल.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस कोसळधारा! वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका मांडताना, अँटनी म्हणाले की त्यांचा पक्ष "पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध सतत लढत आहे." इंडिया आघाडी पुढे जात असून भाजपला याची चिंता वाटत आहे. मला वाटते की सरकार स्थापन करण्याची ही आमच्यासाठी संधी आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवल्याबद्दल राहुल गांधींना फटकारल्यानंतर काही दिवसांनी विजयनवर अँटनी यांनी त्यांच्या विधानावर टीका केली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पराभव होत असल्याचे दिसत असल्याने भाजप काँग्रेसच्या नेत्यांमागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावत असल्याचे अँटनी म्हणाले.

पुढील बातम्या