मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sambhaji nagar lok sabha : संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये होणार लढत, चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे मैदानात

Sambhaji nagar lok sabha : संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये होणार लढत, चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे मैदानात

Apr 20, 2024, 07:04 PM IST

  • Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना रिंगणात उतरवलं आहे. यामुळे येथे भुमरे विरुद्ध खैरे या दोन शिवसैनिकात लढत होणार आहे. 

संभाजीनगरात चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे मैदानात

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना रिंगणात उतरवलं आहे. यामुळे येथे भुमरे विरुद्ध खैरे या दोन शिवसैनिकात लढत होणार आहे.

  • Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना रिंगणात उतरवलं आहे. यामुळे येथे भुमरे विरुद्ध खैरे या दोन शिवसैनिकात लढत होणार आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha: राज्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे (sandipanrao bhumre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून याआधीच ठाकरे गटाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना रिंगणात उतरवलं आहे. भुमरे व खैरे (chandrakant khaire vs sandipanrao bhumre) यांच्या रुपात संभाजीनगरात दोन शिवसैनिकांमध्ये लढत होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election 2024 Phase 5: मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव ऑनलाइन कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray : 'उद्या आरएसएसला संपवायला सुद्धा भाजप मागेपुढे पाहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

छत्रपती संभाजी नगरमतदारसंघातून शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याचे अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. संभाजी नगर हा आधीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र २०१९ मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला होता. तिथे एमआयएमचे इम्तियाज जलील याचा निसटता विजय झाला होता.

संभाजीनगर मतदारसंघातून यावेळी ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इच्छूक होते. त्यांनी तशी मोर्चेबांधणीही केली होती. मात्र ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यात वजन टाकत पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर खैरेंनी आपली ही शेवटची निवडणूक असल्याचं व नंतर आपण राजकीय निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेमुळे अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेने शनिवारी मंत्री संदीपान भूमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येथे शिवसेना,ठाकरे गट,एमआयएम यांच्यात लढत होत आहे. एमआयएमला वंचितने पाठिंबा दिला आहे.

संविधान बदलण्याच्या आरोपांवर अमित शहांचा संताप –

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले की,त्यांचा पक्ष आणि भाजप सरकार आरक्षण हटवणार नाही किंवा संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्दही काढणार नाही.

जर भाजपला राज्यघटना बदलायची असती तर गेली १० वर्षे आम्हाला बहुमत होते, या काळात आम्ही केव्हाही करू शकलो असतो. धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याची आम्हाला गरज नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश राहावा हा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळेच आम्ही समान नागरी संहिता आणत आहोत.

पुढील बातम्या