मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amit Shah Video: अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी मोठी कारवाई, आप-काँग्रेसशी संबंधित दोघांना अटक

Amit Shah Video: अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी मोठी कारवाई, आप-काँग्रेसशी संबंधित दोघांना अटक

Apr 30, 2024, 02:41 PM IST

    • Amit Shah Video: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बनावट व्हिडिओ प्रकरणी सोमवारी आसाम पोलिसांनीही एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रितोम सिंग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अमित शहा बनावट व्हिडिओ प्रकरणी मोठी कारवाई, आप-काँग्रेसशी संबंधित दोघांना अटक

Amit Shah Video: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बनावट व्हिडिओ प्रकरणी सोमवारी आसाम पोलिसांनीही एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रितोम सिंग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    • Amit Shah Video: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बनावट व्हिडिओ प्रकरणी सोमवारी आसाम पोलिसांनीही एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रितोम सिंग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Amit Shah Video: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडीओ प्रकरणी पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही आम आदमी पार्टी म्हणजेच आप आणि काँग्रेसशी पक्षाशी संबंधित असल्याची माहिती आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगाचं केलं स्पष्ट

Lok Sabha Election : अखिलेश यांच्या रॅलीत दगडफेक अन् खुर्चीफेक, कार्यकर्ते एकमेकांवर पडले, पोलिसांचा लाठीचार्ज

PM Modi : पंतप्रधान मोदींचा राजकीय उत्तराधिकारी कोण?; खुद्द मोदींनीच भर सभेत सांगितलं! अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा

Lok Sabha Election : भांगेत कुंकू, हातात लाल चुडा अन् लाल ड्रेसमध्ये EVM घेऊन जाणारी ही सुंदर मतदान अधिकारी कोण?

PM Modi On Sharad Pawar : माढ्याच्या पाणी प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांची शरद पवारांवर टीका; म्हणाले...'ते पुन्हा..'

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आप आणि काँग्रेसशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यापूर्वी सोमवारी आसाम पोलिसांनीही एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रितोम सिंग आहे.

sachin ahir : रवींद्र वायकर यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करणारे किरीट सोमय्या त्यांचा प्रचार करणार का?; विरोधकांचा सवाल

काय आहे प्रकरण ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हीडिओत असा दावा केला जात आहे की शाह भारतीय जनता पार्टी जिंकल्यास एससी/एसटी आरक्षण काढून घेणार आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर आणि व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ एडिट करून शेअर केला जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. खरा व्हिडिओ हा २०२३ सालचा तेलंगणामध्ये दिलेल्या भाषणाचा होता, ज्यामध्ये गृहमंत्री मुस्लिम आरक्षण रद्द करण्याविषयी बोलत होते.

गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांचं चोख प्रत्युत्तर

भाजपने काँग्रेसच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि आरोप केला की त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी शहा यांचा ' खोटा आणि एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केला. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी भाजपने केली आहे.

पीएम मोदींनीही केले आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणी सोमवारी विरोधकांवर टीका केली. भाजप सरकारला घेरण्यात असमर्थ असलेले विरोधक आता सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ पसरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड येथील सभेत मोदींनी सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली होती. एआय तंत्रज्ञान वापरून खोटे व्हिडिओ तयार केले जात असल्याबद्दल त्यांनी चिता देखील व्यक्त केली आणि नागरिकांना अशा खोट्या व्हिडिओ पासून सतर्क राहण्यास सांगितले. तसेच अशा बनावट व्हिडिओ बाबत माहिती असल्यास या बाबत तक्रार करण्यास देखील आवाहन केले. मोदी म्हणाले, 'विरोधक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून माझा, अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासारख्या नेत्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. या 'तंत्रज्ञानाचा वापर करून हे लोक माझ्या आवाजात खोटे व्हिडिओ बनवत आहेत, त्यामुळे धोका निर्माण होत आहे. कोणताही खोट्या व्हिडिओची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन देखील मोदी यांनी केले.

पुढील बातम्या