मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind Vs Sl Highlights : टीम इंडियाची वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक, श्रीलंकेचा ३०२ धावांनी धुव्वा

Ind Vs Sl Highlights : टीम इंडियाची वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक, श्रीलंकेचा ३०२ धावांनी धुव्वा

Nov 02, 2023, 10:59 AM IST

    • ICC World Cup 2023 India Vs Sri Lanka Live : क्रिकेट वर्ल्डकपचा ३३वा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे.
Ind Vs Sl Live Score (PTI)

ICC World Cup 2023 India Vs Sri Lanka Live : क्रिकेट वर्ल्डकपचा ३३वा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे.

    • ICC World Cup 2023 India Vs Sri Lanka Live : क्रिकेट वर्ल्डकपचा ३३वा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे.

 India vs New Zealand Score Updates : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने आज श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य आहे. भारताने सलग सातवा सामना जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा एकतर्फी विजय मिळवला आहे. यापूर्वी आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळून सहज विजय मिळवला होता.

ट्रेंडिंग न्यूज

RCB vs CSK Head to Head : आज आरसीबी-सीएसके थरार रंगणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

CSK vs RCB Weather Report : आयपीएलचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सामना संकटात, बेंगळुरूत आज पावसाची किती शक्यता? पाहा

MI Vs LSG IPL Highlights : मुंबई इंडिन्सचा शेवट पराभवाने, लखनौने १८ धावांनी उडवला धुव्वा

India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच? लवकरच होऊ शकते घोषणा

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून ३५७ धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने ५ बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.४ षटकात केवळ ५५ धावांवर गारद झाला.

श्रीलंकेकडून कसून राजिताने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्यांच्याशिवाय महिष तिक्षिना आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी १२ धावा केल्या. श्रीलंकेचे ५ फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. त्याचवेळी आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ५ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

श्रीलंकेचे ९ फलंदाज तंबूत

४९ धावांवर श्रीलंकेची नववी विकेट पडली. १७ चेंडूत १४ धावा करून कसून रजिता बाद झाला. शमीने त्याला स्लिपमध्ये शुभमन गिलकरवी झेलबाद केले. या सामन्यातील शमीचा हा पाचवा विकेट आहे. या विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत आणि विश्वचषकात भारतासाठी एकूण ४५ बळी घेतले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय खेळाडू आहे.

श्रीलंकेचे ६ फलंदाज तंबूत

१४ धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची सहावी विकेटही पडली. मोहम्मद शमीने दुशान हेमंताला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. हेमंतालाही खाते उघडता आले नाही. आतापर्यंत श्रीलंकेचे चार फलंदाज शून्य धावांवर बाद झाले आहेत. पॉवरप्लेनंतर संघाची धावसंख्या ६ बाद १४ धावा आहे.

कुसल मेंडिस त्रिफळाचीत

श्रीलंकेला तीन धावांवर मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार कुसल मेंडिसही १० चेंडूत एक धाव करून बाद झाला. सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले. या सामन्यातील सिराजचे हा तिसरा विकेट आहे. आशिया कप फायनलप्रमाणेच पुन्हा एकदा भारत श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजयासाठी सज्ज झाला आहे.

करुणारत्ने बाद

श्रीलंकेने दोन धावांवर दुसरी विकेट गमावली आहे. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्नेला पायचीत केले. श्रीलंकेचे दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाले. 

निसंका पहिल्याच चेंडूवर बाद

३५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. पथुम निसांका पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बुमराहने त्याला पायचीत केले. आता दिमुथ करुणारत्ने आणि कर्णधार कुसल मेंडीस यांना मोठी भागीदारी करावी लागणार आहे. त्यानंतरच श्रीलंकेचा संघ सामन्यात टिकून राहू शकेल.

भारताच्या ३५७ धावा

भारताने श्रीलंकेसमोर ३५८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकात ८ गडी गमावून ३५७ धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने ५ बळी घेतले.

अय्यर बाद

भारताला ४८व्या षटकात ३३३ धावांवर सहावा धक्का बसला. मधुशंकाने श्रेयस अय्यरला तिक्षनाकरवी झेलबाद केले. अय्यरने ५६ चेंडूत तीन चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८२  धावा केल्या. सध्या रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी क्रीजवर आहेत. श्रेयसने जडेजासोबत ३६ चेंडूत ५७ धावांची भागीदारी केली. ४८ षटकांनंतर भारताची धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावा आहे. मधुशंकाचा हा पाचवा विकेट होता. याआधी त्याने रोहित, शुभमन, विराट आणि सूर्यकुमार यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं

भारताने ४६ षटकात ५ गडी गमावून ३०९ धावा केल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यर ४८ चेंडूत ६२ धावा तर रवींद्र जडेजा १३  चेंडूत १२ धावांवर फलंदाजी करत आहे.

श्रेयस अय्यरचे अर्धशतक

श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १६वे अर्धशतक झळकावले. त्याने चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. ४३ षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावा आहे. सध्या श्रेयस ५३ धावा करून क्रीजवर आहे तर रवींद्र जडेजाने पाच धावा केल्या आहेत.

केएल राहुल बाद

४०व्या षटकात २५६ धावांवर भारताला चौथा धक्का बसला. दुष्मंता चमीराच्या चेंडूवर केएल राहुल दुसान हेमंताच्या हाती झेलबाद झाला. राहुलने १९ चेंडूत २१ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. श्रेयस अय्यरसोबत त्याने ४६ चेंडूत ६० धावांची दमदार भागीदारी केली. सध्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर आहेत. ४० षटकांनंतर भारताची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा आहे.

श्रेयस अय्यरची आक्रमक फलंदाजी

भारताने ३८ षटकांनंतर ३ बाद २४८ धावा केल्या आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आक्रमक फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये केवळ ३९ चेंडूत ५२ धावांची भागीदारी झाली आहे. श्रेयस २५ चेंडूत ३२ धावा तर राहुल १६ चेंडूत १९ धावा करुन फलंदाजी करत आहे. तत्पूर्वी, विराट कोहली ८८ धावा करून बाद झाला तर शुभमन गिल ९२ धावा करून बाद झाला.

कोहली बाद

विराट कोहली ९४ चेंडूत ८८ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. दिलशान मदुशंकाने त्याला निसांकाकरवी झेलबाद केले. कोहलीचे ४९वे वनडे शतक हुकले. आता श्रेयससोबत लोकेश राहुल क्रीझवर आहे. ३२ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद १९९ आहे.

शुभमन गिल बाद

शुभमन गिल ९२ चेंडूत ९२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. मधुशंकाने त्याला कुसल मेंडिसकरवी झेलबाद केले. आता विराटसोबत श्रेयस अय्यर क्रीझवर आहे.

शुभमन-विराटची शतकी भागिदारी

विराट कोहलीपाठोपाठ शुभमन गिलनेही ५५ चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ११वे अर्धशतक होते. या दोघांमध्ये आतापर्यंत १४७   हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. २५ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर १५१ धावा आहे. विराट ७३ धावा करून आणि शुभमन गिल ६५ धावा करून क्रीजवर आहे.

कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने ५० चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ७० वे अर्धशतक होते. यासह या दोघांनी भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली आहे. १७ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर १०६ धावा आहे. विराट ५२ धावा करून आणि शुभमन ४० धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये आतापर्यंत १०२ धावांची भागीदारी झाली आहे.

गिल-कोहलीने डाव सावरला

चार धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलने डाव सांभाळला आहे. दोघांनी मिळून ६० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. १२ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर ७२ धावा आहे. सध्या विराट ३५ धावा करून क्रीजवर आहे तर शुभमनने २६ धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा त्रिफळाचीत

पहिल्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला. दिलशान मदुशंका पहिले षटक टाकायला आला. पहिल्याच चेंडूवर रोहितने फाइन लेगच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मधुशंकाने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. एका षटकानंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर ८ धावा आहे. या षटकात विराट कोहलीने फाइन लेगवर एक चौकार मारला. त्याच्यासोबत शुभमन गिल क्रीझवर आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थीक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.

श्रीलंकेने टॉस जिंकला

श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. धनंजय डी सिल्वाच्या जागी फिरकीपटू दुशान हेमंताचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार आणि शमी खेळताना दिसणार आहेत.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

शुभमन-श्रेयस फ्लॉप

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना या स्पर्धेत मोठी खेळी करता आलेली नाही. गिल डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही आणि पुनरागमनानंतरही त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. 

त्याच वेळी, श्रेयस अय्यरची शॉर्ट पिच चेंडूंवरची कमजोरी सर्वांनाच ठाऊक आहे . यावर त्याने कठोर सरावही केला. अय्यरने ६ सामन्यांत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. अनेक प्रसंगी तो मधल्या फळीत अपयशी ठरला. दोन्ही फलंदाजांना मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

इशान किशन खेळणार?

या सामन्यात श्रेयस अय्यरला वगळायचे असेल तर इशान किशनचे पुनरागमन होऊ शकते. विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ईशानने सलामीला आला होता. मधल्या फळीतही तो धावा काढण्यास सक्षम आहे. तोआला तर संघाला डावखुरा फलंदाजही मिळेल. आता रोहित शर्मा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणतो की नाही हे पाहायचे आहे.

या वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी

या विश्वचषकात भारताचा आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. भारताने आपले सर्व सहा सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात १२ गुण आहेत. ही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे.

या वर्ल्डकपमधील श्रीलंकेची कामगिरी

या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यात त्यांनी दोन विजय मिळवले आहेत. श्रीलंकेने नेदरलँड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विश्वचषकात भारत-श्रीलंका हेड टू हेड

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात ९ सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघ बरोबरीत आहेत. भारत आणि श्रीलंकेने प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला. श्रीलंकेने १९७९, १९९६ (दोनदा) आणि २००७ च्या वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला होता. तर भारताने १९९९, २००३, २०११ आणि २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा पराभवा केला आहे.

वर्ल्डकपसाठी दोन्ही संघ 

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, इशान किशन.

श्रीलंका

कुसल मेंडिस (कर्णधार आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, दुष्मंथा चमीरा, महेश थीक्षाना, कसुन रजिथा, दिलशान मदुशंका, चमिका करुणालने, दुनिथ वेलालगे, दुसन हेमंता, कुसल परेरा.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi
पुढील बातम्या