मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND Vs NZ Semi Final : टीम इंडिया फायनलमध्ये, शमीचे ७ विकेट, मिचेलचे शतक व्यर्थ

IND Vs NZ Semi Final : टीम इंडिया फायनलमध्ये, शमीचे ७ विकेट, मिचेलचे शतक व्यर्थ

Nov 15, 2023, 10:29 AM IST

    • IND Vs NZ Semi Final World Cup score : क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये आज पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.
World Cup 1st Semi Final 2023 (AP)

IND Vs NZ Semi Final World Cup score : क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये आज पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.

    • IND Vs NZ Semi Final World Cup score : क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये आज पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.

 india vs New Zealand Semi Final Scorecard : क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताने ४ गडी गमावून ३९७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. विराट कोहलीने संघाकडून सर्वाधिक ११७ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने १०५ धावा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

MI vs LSG Weather Report : मुंबई-लखनौ सामना होणार का? आज असं असेल मुंबईचं हवामान, पाहा

SRH vs GT: पावसामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रद्द

RCB vs CSK: बंगळुरू- चेन्नई सामन्याचे तिकिट बुक करायला गेला अन् ३ लाख गमावले, सायबर गुन्हेगारापासून सावधान!

SRH vs GT: सनरायझर्स हैदराबाद- गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात पाऊस, नाणेफेकीला उशीर

शुभमन गिल ८० आणि केएल राहुल ३९ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्माने ४७ धावांची तुफानी खेळी केली. किवी संघाकडून टीम साऊदीने ३ बळी घेतले.

३९८ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंड संघ ३२७ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना 70 धावांनी गमावला.

न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेलने १३४ धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यमसनने ६९ आणि ग्लेन फिलिप्सने ४१ धावा केल्या. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक ७ बळी घेतले.

डॅरिल मिशेल बाद

न्यूझीलंडची सातवी विकेट ३०६ धावांवर पडली. डॅरिल मिशेल ११९ चेंडूत १३४ धावा करून बाद झाला. त्याने ९ चौकार आणि ७ षटकार मारले. मोहम्मद शमीने त्याला रवींद्र जडेजाकरवी झेलबाद केले. या सामन्यातील शमीचे हा पाचवा विकेट आहे.

ग्लेन फिलिप्स बाद

४३व्या षटकात जसप्रीत बुमराहने ग्लेन फिलिप्सला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले. तो ३३ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा करून बाद झाला. आता न्यूझीलंडला सात षटकांत १०३ धावांची गरज आहे.

केन विल्यमसन बाद

न्यूझीलंडची तिसरी विकेट २२० धावांवर पडली. केन विल्यमसन ७३ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.

मिशेल-विल्यमसन क्रीजवर

डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्यात शतकी भागीदारी झाली असून न्यूझीलंड संघ सामन्यात कायम आहे. डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली आहेत आणि न्यूझीलंडला लक्ष्याच्या जवळ नेत आहेत. ही भागीदारी भारतासाठी अत्यंत धोकादायक असून भारतीय गोलंदाजांना ती लवकरात लवकर मोडावी लागेल. २६ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद १६५ आहे.

न्यूझीलंडला दुसरा धक्का

न्यूझीलंडची दुसरी विकेट ३९ धावांवर पडली. रचिन रवींद्र २२ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला लोकेश राहुलकडे झेलबाद केले. आता डॅरिल मिशेल केन विल्यमसनसोबत क्रीजवर आहे. पॉवरप्लेनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४६/२ आहे.

न्यूझीलंडची फलंदाजी सुरू

३९८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे ही जोडी क्रीझवर आहे. कॉनवेने चौकार मारून डावाची सुरुवात केली. त्याने पहिल्याच षटकात बुमराहविरुद्ध २ चौकार मारले. एका षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद ८ धावा आहे. 

भारताच्या ३९७ धावा

प्रथम फलंदाजी करताना भारताने चार गडी गमावून ३९७ धावा केल्या आहेत. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुभमन गिलने नाबाद ८० धावा केल्या. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने ३९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.

श्रेयस अय्यरचं शतक

श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आहे. सध्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत.

विराट कोहली बाद

भारताची दुसरी विकेट ३२७ धावांवर पडली. विराट कोहली ११३ चेंडूत ११७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताला ४०० धावा करण्याची संधी आहे. आता लोकेश राहुल श्रेयस अय्यरसोबत क्रीजवर आहे.

विराटचं ५०वे शतक

विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील ५० वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

भारताने ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आता कोहली आणि श्रेयस तुफानी फलंदाजी करून भारताची धावसंख्या ४०० धावांच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.

विराटने सचिनचा विक्रम मोडला

विराट कोहलीने या विश्वचषकात ६७३ हून अधिक धावा केल्या आहेत आणि तो आता एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विराट आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या २५० धावांच्या जवळ पोहोचली आहे.

कोहली आणि श्रेयस यांच्यात अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. ३४ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद २४८ धावा झाली आहे.

विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीने ५९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करण्याच्या बाबतीत त्याने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. भारताची धावसंख्या एका विकेटवर २०० धांवापार झाली आहे.

शुभमन गिल रिटायर्ड हर्ट

शुभमन गिल निवृत्त झाला आहे. गिलला क्रॅम्प्सचा त्रास जाणवत असल्याने तो मैदानाबाहेर गेला. गिल ६५ चेंडूत ७९ धावा करून  तंबूत परतला. गिलने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. २३.२ षटकानंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर १६७ धावा आहे. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.

समालोचक हरभजन सिंग कॉमेंट्रीमध्ये म्हणाला, की विकेट पडल्यानंतर गिल पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. आता त्याच्या जागी श्रेयस अय्यर आला आहे.

भारताच्या १५० धावा पूर्ण

भारताने एक विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. शुभमन गिल आता वेगाने धावा करत आहे आणि त्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे. कोहली आणि गिल यांच्यात चांगली भागीदारी आहे. २१ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद १५३ झाली आहे.

शुभमन-विराटमध्ये अर्धशतकी भागीदारी

शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत आहेत. गिल आपले अर्धशतक पूर्ण करून खेळत आहे. त्याचबरोबर कोहलीही आपल्या अर्धशतकाच्या जवळ जात आहे.

शुभमन गिलचं अर्धशतक

शुभमन गिलने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील १३वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद ११८ धावा आहे.

रोहित शर्मा बाद

भारताची पहिली विकेट ७१ धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा २९ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना तो केन विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला. हा झेल खूप अवघड होता, पण विल्यमसनने अप्रतिम झेल घेतला. आता विराट कोहली शुभमन गिलसोबत क्रीजवर आहे. ९ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद ७५ धावा आहे.

८ षटकात ७० धावा

रोहित शर्मा वेगाने धावा करत असून तो अर्धशतकाच्या जवळ आहे. ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनाबाद ७० धावा आहे.

५ षटकात ४७ धावा

अवघ्या ५ षटकांत टीम इंडियाची धावसंख्या एकही विकेट न पडता ४७ धावांवर पोहोचली आहे. रोहित शर्मा ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३४ धावांवर खेळत आहे. तर शुभमन गिल २ चौकारांसह १२ धावांवर खेळत आहे.

भारताची धमाकेदार सुरुवात

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताने दोन षटकात एकही विकेट न गमावता १८ धावा केल्या आहेत. रोहित आणि गिल दोघेही वेगाने धावा करत आहेत आणि दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी २ चौकार मारले आहेत. टीम इंडिया आपल्या परिचित शैलीत खेळत असून पॉवरप्लेमध्ये पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्याच्या मार्गावर आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

भारताची प्रथम फलंदाजी

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच, केन विल्यमनसनेदेखील त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही.

BCCI ने टीम इंडियाच्या फायद्याची पीच बनवली

उपांत्य फेराचा सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद सुरू झाला आहे. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत परदेशी मीडियाने गदारोळ सुरू केला आहे. त्यांनी बीसीसीआयवर पक्षपाताचा आरोप केला आहे. परदेशी मीडियानुसार, बीसीसीआयने आपल्या आवडीची खेळपट्टी बनवली आहे, ज्यामुळे टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. उपांत्य किंवा अंतिम सामने नेहमी नवीन खेळपट्टीवर खेळले पाहिजेत. 

मात्र, आयसीसीने आपल्या नियमांमध्ये याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ही स्पर्धा आयसीसी आयोजित करत आहे आणि पीच क्युरेटर त्यांचे स्वतःचे आहेत. उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीसाठी नवीन खेळपट्टी वापरली जावी असा नियम कुठेही नाही.

दोन्ही संघ वानखेडेवर पोहोचले

भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचला आहे.

काही कारणांमुळे सामना झाला नाहीतर काय होईल?

या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत, जर पाऊस किंवा इतर कारणामुळे खेळ थांबला, तर पंच दोन्ही डावात किमान २० षटके खेळवून डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतील. जर हे देखील शक्य झाले नाही तर हा सामना रद्द होईल आणि भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल, कारण भारताने गट टप्प्यातील सर्व सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. याचबरोबर न्यूझीलंडचा संघ ५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

भारत चौथ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये

भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. टीम इंडिया १९८३ मध्ये चॅम्पियन बनली होती. त्यानंतर भारत २००३ मध्ये फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. तर २०११ मध्ये भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून जेतेपद पटकावले.

भारताने सर्व सामने जिंकले

या विश्वचषकात भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताने साखळी टप्प्यातील सर्व ९ सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ केवळ दोन सामन्यांमध्ये बदलांसह उतरला होता. पहिल्या सामन्यात खेळलेल्या अश्विनच्या जागी शार्दुलला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आणि चौथ्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाल्यानंतर शार्दुलच्या जागी मोहम्मद शमीचा तर जखमी हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi
पुढील बातम्या