मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stock : तीन वर्षांत १० हजारांचे झाले सव्वा चार लाख, कोणता आहे हा शेअर?

Multibagger stock : तीन वर्षांत १० हजारांचे झाले सव्वा चार लाख, कोणता आहे हा शेअर?

Jan 04, 2024, 07:03 PM IST

  • Waaree Technologies : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत योग्य निवड आणि संयमाला किती महत्त्व असतं याची प्रचिती वारी टेक्नॉलॉजीस या कंपनीनं दिली आहे.

Waaree Technologies Ventures (Pixabay)

Waaree Technologies : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत योग्य निवड आणि संयमाला किती महत्त्व असतं याची प्रचिती वारी टेक्नॉलॉजीस या कंपनीनं दिली आहे.

  • Waaree Technologies : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत योग्य निवड आणि संयमाला किती महत्त्व असतं याची प्रचिती वारी टेक्नॉलॉजीस या कंपनीनं दिली आहे.

Waaree Technologies Share Price : रिन्यूएबल एनर्जीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वारी टेक्नॉलॉजीसच्या शेअर्सनं अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. मागच्या अवघ्या ३ वर्षांत कंपनीनं गुंतवणूकदारांना ४ हजार टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

वारी टेक्नॉलॉजीसचा शेअर जानेवारी २०२१ मध्ये अवघ्या २०.४० रुपयांवर होता. हाच शेअर आज ८७४ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. ही वाढ तब्बल ४१८५ टक्क्यांची आहे. याचाच अर्थ जानेवारी २०२१ मध्ये या पेनी स्टॉकमध्ये एखाद्यानं १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असेल व ती तीन वर्षे होल्ड केली असेल तर त्या गुंतवणुकीचं मूल्य आज ४.२८ लाख रुपये असेल.

नव्या वर्षातील पहिल्या चार दिवसांतच हा शेअर जवळपास २२ टक्क्यांनी वधारला आहे. सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत या शेअरमध्ये तब्बल १५२ टक्के वाढ झाली आहे. २०२३ मध्ये फक्त तीन महिने हा शेअर घसरला होता. इतर ९ महिन्यांपैकी ६ महिन्यांत त्यानं दोन अंकी परतावा दिला. 

IPO News : शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करताय?; तुमच्यासाठी येतेय मोठी संधी

एका वर्षात ४२९ टक्के वाढ

मार्चमध्ये ३६ टक्के, मे महिन्यात ३० टक्के, तर ऑक्टोबरमध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली. मागील महिन्यात, म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये या शेअरमध्ये सर्वाधिक ५४ टक्के वाढ झाली होती. मागच्या एका वर्षात शेअरनं ४२९ टक्के परतावा दिला आहे. गेल्या काही तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्यानं कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न ८० टक्क्यांनी वाढून १३.७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला दोन कोटी रुपयांचा तोटा झाला असून गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला १५ लाख रुपयांचा नफा झाला होता.

PNB News : पंजाब नॅशनल बँकेनं वाढवले एफडीचे व्याजदर; किती होणार फायदा?

काय करते ही कंपनी?

वारी टेक्नॉलॉजीज लिमिटेड लिथियम बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करते. फोर्कलिफ्ट आणि ट्रॅक्शन सोल्यूशन्स, टेलिकॉन आणि एनर्जी स्टोरेज सिस्टम, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि दुचाकी, तीन चाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी बॅटरी पुरवते. वारीची उत्पादनं ई-सायकल, ई-फोर्कलिफ्ट, ई-रिक्शा, बॅटरी एनर्जी सिस्टम आणि टेलिकॉम यूपीएसमध्ये वापरली जातात. ही कंपनी ई-वाहनांच्या व्यवसायात देखील असून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उत्पादने व सेवाही पुरवते.

ही कंपनी पूर्वी एचके ट्रेड इंटरनॅशनल लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. जानेवारी २०१९ मध्ये तिचं नाव बदलून वारी टेक्नॉलॉजीस लिमिटेड करण्यात आलं. वारी टेक्नॉलॉजीस लिमिटेडची स्थापना १९९३ मध्ये झाली. कंपनीचं मुख्यालय मुंबईत आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

पुढील बातम्या