मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Elon Musk : व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे आता ट्विटरवरून करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल, नंबर शेअर करण्याचीही गरज नाही!

Elon Musk : व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे आता ट्विटरवरून करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल, नंबर शेअर करण्याचीही गरज नाही!

May 10, 2023, 03:29 PM IST

  • Audio Video call on Twitter : व्हॉट्सअ‍ॅप्रमाणेच आता ट्विटरवरही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. विशेष म्हणजे हे करताना फोन नंबर शेअर करण्याची गरज नसेल.

Elon Musk

Audio Video call on Twitter : व्हॉट्सअ‍ॅप्रमाणेच आता ट्विटरवरही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. विशेष म्हणजे हे करताना फोन नंबर शेअर करण्याची गरज नसेल.

  • Audio Video call on Twitter : व्हॉट्सअ‍ॅप्रमाणेच आता ट्विटरवरही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. विशेष म्हणजे हे करताना फोन नंबर शेअर करण्याची गरज नसेल.

Audio Video call on Twitter : सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅपच्या तोडीचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म ट्विटरवर लवकरच नवी सेवा मिळणार आहे. या सेवेमुळं ट्विटर युजर स्वत:चा फोन नंबर शेअर न करता ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत. ट्विटरचे मुख्य कार्यकारी इलॉन मस्क यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इनकमिंग कॉल्स आणि एनक्रिप्टेड मेसेजिंगसह नव्या सुविधांची मस्क यांनी माहिती दिली. मागील वर्षी मस्क यांनी Twitter 2.0 the everything app ला हिरवा झेंडा दाखवला होता. या योजनेंतर्गत इनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेज (DMs), लाँगफॉर्म ट्वीट्स आणि पेमेंट्स सारख्या सुविधांचा समावेश असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

लवकरच युजर आपल्या ट्विटर हँडलवरून कोणाशीही व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करू शकतील. स्वत:चा फोन नंबर शेअर न करता जगातील कोणाशीही ट्विटर युजर्सना संवाद साधता येईल, असं मस्क यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. अ‍ॅपच्या नव्या फॉरमॅटमध्ये ट्विटर युजर्सना थ्रेडमधील कोणत्याही संदेशाला उत्तर देण्याची सुविधा दिली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

फेसुबक व इन्स्टाग्रामवर आधीपासूनच ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळं Twitter वर कॉलिंगची सुविधा सुरू झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म Facebook आणि Instagram च्या रांगेत येऊन बसणार आहे.

इन्क्रिप्टेड डायरेक्ट मेसेजची सुविधा बुधवारपासून ट्विटरवर उपलब्ध होईल, परंतु कॉल एनक्रिप्ट केले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेली खाती काढून टाकून साफसफाईची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही ट्विटरनं स्पष्ट केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या