मराठी बातम्या  /  बिझनेस  /  MyJio offer : माय जिओ अ‍ॅपच्या युजर्सना जबरदस्त ऑफर, फुकटात मिळणार १ जीबी डेटा, कसा घ्याल लाभ?

MyJio offer : माय जिओ अ‍ॅपच्या युजर्सना जबरदस्त ऑफर, फुकटात मिळणार १ जीबी डेटा, कसा घ्याल लाभ?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 10, 2023 01:05 PM IST

Reliance MyJio data offer : रिलायन्स जिओनं माय जिओ अ‍ॅपच्या युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. क्रिकेटप्रेमी युजर्सना या ऑफरचा सहज लाभ घेता येणार आहे.

Reliance JIO
Reliance JIO (REUTERS)

MyJIO app new data offer : दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांवर सातत्यानं सवलतींचा वर्षाव करत आहे. आता कंपनीनं आपल्या MyJio अ‍ॅपच्या युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. त्यानुसार, माय जिओ अ‍ॅप वापरणाऱ्या ग्राहकांना १ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन युजर्सना या ऑफरचा लाभ मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या माय जिओ अ‍ॅपवरील JioEngage विभागासह १ जीबी पर्यंत मोफत मोबाइल डेटा ऑफर करत आहे. रिचार्ज, संगीत, गेम, मोबाइल बँकिंग, न्यूज अपडेट्स, आरोग्य सेवा आणि इतर बऱ्याच सुविधा असल्यानं हे अ‍ॅप जिओ युजर्ससाठी वन स्टॉप सोल्यूशन आहे.

१ जीबी मोफत डेटासह इतरही ऑफर

१ जीबीपर्यंत मोफत डेटा मिळवण्यासाठी युजर्सना क्रिकेटशी संबंधित साध्या-सोप्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. या ऑफरमुळं MyJio अ‍ॅपच्या युजर्सना सहकुटुंब सिंगापूर सहलीची लॉटरीही लागू शकते. याशिवाय क्वीजमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना १ वर्षाचा जिओ रिचार्ज जिंकण्याची संधी देखील आहे. जाणून घेऊ या ऑफरचा लाभ कसा उठवता येईल?

  • तुमच्या Android स्मार्टफोनवर किंवा iPhone वर माय जिओ अ‍ॅप अपडेट करा.
  • MyJio अ‍ॅप उघडा आणि JioEngage विभागात जा.
  • JioEngage विभागाखाली 'James Cricket' बॅनर दिसेल.
  • इथं तुम्हाला नाव आणि ईमेल सारखे काही मूलभूत तपशील भरावे लागतील.
  • त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट इमेजचा अंदाज घेण्यास सांगितलं जाईल. ती प्रक्रिया पूर्ण करताच तुम्हाला १ जीबी मोफत डेटा मिळेल.

WhatsApp channel