मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SSY : सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! तात्काळ चेक करा खात्यातील बॅलन्स, अन्यथा…

SSY : सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! तात्काळ चेक करा खात्यातील बॅलन्स, अन्यथा…

Mar 23, 2023, 04:29 PM IST

  • Sukanya Samruddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या गुंतवणूकदराांना पुन्हा एकदा ३१ मार्चपूर्वी झटका लागू शकतो.

Sukanya Samruddhi yojana HT

Sukanya Samruddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या गुंतवणूकदराांना पुन्हा एकदा ३१ मार्चपूर्वी झटका लागू शकतो.

  • Sukanya Samruddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या गुंतवणूकदराांना पुन्हा एकदा ३१ मार्चपूर्वी झटका लागू शकतो.

Sukanya Samruddhi Yojana : केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या वाढीव व्याजदराच्या प्रतिक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा झटका बसू शकतो. पुढील तिमाही एप्रिल ते जून दरम्यान व्याजदर स्थिर राहतील असा अंदाज आहे. मात्र ३१ मार्चपूर्वी संपत आलेल्या आर्थिक वर्षात एसएसवायच्या खात्यात किमान २५० रुपये जमा नसल्यास गुंतवणूकदारांना ५० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अशी आहे योजना

या योजनेंतर्गंत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. तुम्ही २५० रुपयांपेक्षा किमान रकमेच्या गुंतवणूकीपासून सुरुवात करता येऊ शकते. एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम १.५ लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेंतर्गत जमा रकमेवर ८० सी अंतर्गत करसवलत मिळते. या करारांतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जाते. सरकार सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकीवर ७.६ टक्के व्याज देते. खाते उघडल्याच्या दिवसापासून १४ वर्षांपर्यंत खात्यात पैसे जमा करता येऊ शकतात.

रक्कम काढण्याची सुविधा

उच्च शिक्षण आणि लग्नाच्या इराद्याने खातेधारकांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. मुलीच्या वयाच्या १८ वर्षांनंतर अंशत रक्कम काढण्याची मुभा दिली जाते. यात लाभार्थी मुलीचे लग्न मच्युरिटीच्या आधी झाले तर हे खाते बंद करावे लागते.

१२ तिमाहीपासून स्थिर व्याजदर

सलग १२ तिमाहीत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात बदल केलेला नाही. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने जानेवारी मार्च तिमाहीसाठी काही छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात बदल केला होता. याशिवाय पब्लिक प्राॅव्हिडंट फंडसारख्या लोकप्रिय योजनांवरील व्याजदरही बदलण्यात आले होते.

विभाग

पुढील बातम्या