मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Success Story : सोलापूरच्या शेतकऱ्याने गायींचे शेण विकून गावात बांधला १ कोटींचा अलिशान बंगला

Success Story : सोलापूरच्या शेतकऱ्याने गायींचे शेण विकून गावात बांधला १ कोटींचा अलिशान बंगला

Feb 21, 2024, 04:38 PM IST

  • Farmer Success Story : कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे मोठे भांडवल असले पाहिजे याची काही गरज नाही. केवळ तुमच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया हवी. याचे उदाहरण सोलापूरच्या शेतकऱ्याने निर्माण केले आहे.

Farmer Success Story

Farmer Success Story : कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे मोठे भांडवल असले पाहिजे याची काही गरज नाही. केवळ तुमच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया हवी. याचे उदाहरण सोलापूरच्या शेतकऱ्याने निर्माण केले आहे.

  • Farmer Success Story : कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे मोठे भांडवल असले पाहिजे याची काही गरज नाही. केवळ तुमच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया हवी. याचे उदाहरण सोलापूरच्या शेतकऱ्याने निर्माण केले आहे.

मराठी माणसाला धंदा कसा करावा यांचे तंत्र माहीत नसल्याचे बोललं जातं. मात्र जर मराठी माणसानं व्यवसाय सुरु करण्याचं मनावर घेतलं तर तो शुन्यावर विश्व निर्माण करू शकतो. हे यापूर्वी अनेक मराठी उद्योगपतींनी दाखवून दिलं आहे. असाच व्यवसायातील एक आदर्श सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकरीने निर्माण केला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केवळ गायींचे शेण विकून १ कोटी रुपयांचा अलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्याचे नावही त्यांनी 'गोधन निवास' ठेवले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

महान उद्योगपतींनी सांगितले आहे की, कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे मोठे भांडवल असले पाहिजे याची काही गरज नाही. केवळ तुमच्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया हवी. या शेतकऱ्यानेही असेच केले. जे शेण लोक उकीरड्यावर फेकून देतात त्याच शेणातून कोट्यवधीचा व्यवसाय निर्माण केला. या शेतकऱ्याची यशोगाथा ऐकून तुम्हाही थक्क व्हाल.

या शेतकऱ्याचे नाव प्रकाश नेमाडे असे आहे. प्रकाश सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील इमदेवाडी गावात राहतात. त्यांच्याकडे ४ एकर वडिलोपार्जित जमीन होती. मात्र दुष्काळी भाग असल्याने येथे शेती करणे शक्य नव्हते. यामुळे प्रकाश यांनी उदरनिर्वाह चालवण्यासाठी गायींचे दूध विकायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे केवळ १ गाय होती. या गायीचे दूध ते गावभर हिंडून विकत असते. आज त्यांच्याकडे १५० हून अधिक गायी आहेत. त्यानंतर एका स्मार्ट उद्योगपतीप्रमाणे त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी दुधासोबत शेणही विक्री करायला सुरूवात केली.

अनेक शेतकरी आता शेतात रासायनिक खतांचा वापर टाळून जैविक खतांचा वापर करत आहेत. त्याचबरोबर गोबर गॅस प्लांटही उभारत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेणाची आवश्यकता असते. याचे महत्व विचारात घेऊन नेमाडे यांनी १५० गायींचे शेण विकायला सुरूवात केली. त्यामुळे ते वृद्ध गायींचा मृत्यू होईपर्यंत सांभाळ करतात. म्हणजेच ते गाय दूध देणे बंद केल्यानंतर तिला न विकता व सोडून देता तिचा सांभाळ करतात. यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणात शेण मिळते. याच्या विक्रीतून त्यांनी नवा व्यवसाय निर्माण केला आहे. जैविक खते व गोबर गॅस शिवाय धूप बनवणे व अन्य उद्योगातही गायीच्या शेणाला मोठी मागणी आहे.

प्रकाश नेमाडे सांगतात की, ४ एकर पडीक जमिनीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. याच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे. आज राज्यभरातून तरुण उद्योजक त्यांचा प्रकल्प पाहण्यासाठी  इमदेवाडी गावात येतात व नव्या व्यवसायाची प्रेरणा घेऊन जातात.

पुढील बातम्या