मराठी बातम्या  /  Business  /  Success Story How To Bhavish Aggarwal Gets Idea To Start Ola Cabs

Success Story : टॅक्सीच्या भाड्यावरून भांडण झालं आणि सुचली भन्नाट आयडिया; वाचा ‘ओला कॅब्स’ची प्रेरक कथा

bhavish agarwal, owner, ola cabs HT
bhavish agarwal, owner, ola cabs HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Sep 15, 2023 07:24 PM IST

Success Story of Ola Cabs : ओला कॅब सुरू करणाऱ्या भावेश अग्रवाल यांची सक्सेस स्टोऱी इंटरेस्टिंग आहे. कारण केवळ एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत झालेल्या बाचाबाचीतून त्यांना ही सुपर हीट संकल्पना सुचली.

Success Story of Ola Cabs : भांडणामुळे प्रत्येकाला मनस्ताप होतो. पण कधीकधी त्यातूनही नवा मार्ग, नवी संकल्पना सुचू शकते. असंच काहीसं झालं भावेश अग्रवाल यांच्या बाबतीत. आयुष्यातील छोट्या छोट्या भांडणातून त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली आणि त्यातूनच त्यांना नवी बिझनेस आयडिया गवसली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी ती अंमलात आणलीच पण आजमितीला देशभरात त्यांची ओला कॅब कंपनी प्रसिद्धही झालीये.

ट्रेंडिंग न्यूज

आपल्यापैकी प्रत्येकाने ओला कॅबमधून किमान एकदातरी प्रवास केला असेल. ओलाची सुरुवात आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांनी केली. ही कॅब सेवा सुरू करण्याची संकल्पना त्यांना एका भांडणातून गवसली.

ते स्वत: एकदा टॅक्सीतून प्रवास करत होते. तेंव्हा त्यांना ड्रायव्हरच्या मनमानी कारभाराला सामोरं जावं लागलं. या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांच्याकडून अतिरिक्त भाड्याची मागणी केली. त्यावरून या दोघांमध्ये चांगलीच जुंपली. पण त्यानंतर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हिसची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणत्याही प्रवासादरम्यान प्रवासी ही ड्रायव्हरची जबाबदारी आहे आणि टॅक्सीसेवा प्रवाशांना आरामात मिळू शकेल, अशी त्यांची संकल्पना होती.

कुटूंबाकडून फारसा मिळाला नाही सपोर्ट

नोकरी सोडून कॅब सेवा सुरू करण्याचा निर्णय भावेश यांनी कुटूंबासमोर व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयाला कुटूंबातील सदस्यांनी फारसा पाठिंबा दर्शवला नाही. कारण आयटीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ट्रॅव्हलमध्ये कॅब सुरू करण्याचा निर्णय त्यांच्या कुटूंबियांच्या फारसा पचनी पडला नव्हता. पण भावेश आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी २०११ मध्ये बेंगळूरूमध्ये अंकित भाटी या त्यांच्या मित्रासोबत ओला कॅबची सुरूवात केली. या कॅबला देशात जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आज देशातील कोट्यवधी जनता ओला कॅबद्वारे कार, आॅटो बुक करण्यासाठी ओला कॅब ही त्यांची प्राथमिकता असते.

ओला कॅबचे नेटवर्थ

ओला कॅबचे मूल्यांकन ४.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३९८३२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय भावेश अग्रवाल यांनी २०१७ मध्ये ओला इलेक्ट्रिक नावाची दुसरी कंपनी सुरू केली. कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे उत्पादन घेते . गेल्या वर्षी कंपनीने सुमारे २४०० कोटी रुपये ($300 दशलक्ष) भांडवल उभे केले होते.

विभाग