मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : १०० रुपयांवर आला होता आयपीओ, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट

IPO News : १०० रुपयांवर आला होता आयपीओ, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट

Jan 03, 2024, 03:19 PM IST

  • IPO Listing News Today 3 January 2024 : श्री बालाजी कंपोनेंट्स कंपनीच्या आयपीओनं आज मुंबई शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री केली. 

shri balaji valve components ipo listing

IPO Listing News Today 3 January 2024 : श्री बालाजी कंपोनेंट्स कंपनीच्या आयपीओनं आज मुंबई शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री केली.

  • IPO Listing News Today 3 January 2024 : श्री बालाजी कंपोनेंट्स कंपनीच्या आयपीओनं आज मुंबई शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री केली. 

shri balaji valve components ipo listing : मागचं वर्ष गाजवल्यानंतर आता नव्या वर्षातही आयपीओची माळ लागली आहे. शेअर बाजारात आज सूचीबद्ध झालेल्या श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

श्री बालाजी व्हॉल्व्ह कंपोनेंट्सच्या आयपीओचा दरपट्टा ९५ ते १०० रुपये असा होता. १०० रुपये दरानं आयपीओचं वाटप झालं होतं. आज शेअर मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर ९० टक्के वाढून सूचीबद्ध झाला आहे. त्यानंतर काही क्षणातच हा शेअर १९९.५० रुपयांवर गेला. त्यामुळं गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट झाले. 

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

कधी आला होता आयपीओ? 

श्री बालाजी व्हॉल्व्ह कॉम्पोनंट्सचा आयपीओ २७ डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि तो २९ डिसेंबर २०२३ रोजी बंद झाला. आयपीओचं वाटप नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी झालं होतं.

आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ २७६ पट सबस्क्राइब झाला. या आयपीओला किरकोळ श्रेणीमध्ये १६९.९५ पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीमध्ये ७०.०४ पट आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीमध्ये ७९९.७० पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.

Bonus Share Explained : बोनस शेअर्स म्हणजे काय? ते का आणि कोणाला दिले जातात? जाणून घ्या सर्वकाही

श्री बालाजी व्हॉल्व्ह कॉम्पोनंट्सला आयपीओच्या माध्यमातून २१.६० लाख उभारायचे आहेत. हा संपूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.

आयपीओद्वारे उभारला जाणारा निधी नवीन प्रकल्प, यंत्रसामुग्री खरेदी करण्याबरोबरच अन्य कामांसाठी व खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या