मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Holiday : मार्च संपेपर्यंत बँकांना सुट्टी नाहीच, रविवारीही कामकाज होणार, आरबीआयचा नवा आदेश!

Bank Holiday : मार्च संपेपर्यंत बँकांना सुट्टी नाहीच, रविवारीही कामकाज होणार, आरबीआयचा नवा आदेश!

Mar 22, 2023, 03:24 PM IST

  • RBI New Order Bank Holiday : मार्च महिना संपल्यानंतर एक आणि दोन एप्रिल या दोन्ही दिवशी बँका बंद राहतील.

Reserve Bank of India New Order About Bank Holiday (HT)

RBI New Order Bank Holiday : मार्च महिना संपल्यानंतर एक आणि दोन एप्रिल या दोन्ही दिवशी बँका बंद राहतील.

  • RBI New Order Bank Holiday : मार्च महिना संपल्यानंतर एक आणि दोन एप्रिल या दोन्ही दिवशी बँका बंद राहतील.

Reserve Bank of India New Order About Bank Holiday : यंदाचं आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसच उरलेले असतानाच आता देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडियानं देशभरातील बँकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. यंदाच्या वर्षातील खर्चाची गणना आणि रेकॉर्ड्स तयार करण्यासाठी देशभरातील बँकांना येत्या ३१ मार्चपर्यंत कोणतीही सुट्टी न देण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. त्यामुळं आता मार्च अखेरपर्यंत शनिवार आणि रविवारी देखील बँकांचं कामकाज सुरुच राहणार आहे. मार्च संपल्यानंतर एक आणि दोन एप्रिलला बँकांना दोन दिवस सुट्टी दिली जाणार आहे. त्यामुळं आता या आठवड्यात अनेक बँकांमधील कर्मचाऱ्यांचं काम मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

चालू आर्थिक वर्ष संपत असताना सर्व कामकाज नियोजित वेळेआधी संपवण्यासाठी आरबीआयनं बँका सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बँकांमध्ये ग्राहकांसाठी कोणतेही काम केले जाणार नाही. परंतु ग्राहकांना धनादेश बँकेच्या शाखेत जमा करता येणार आहेत. याशिवाय आरबीआयच्या या निर्णयाचा ऑनलाईन बँकिंगवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मार्च महिना संपल्यानंतर देशात नवं आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यापूर्वी बँकांसह आर्थिक संस्थांमधील वर्षभरातील खर्चांची गणना करून त्याचं रेकॉर्ड तयार केलं जातं. त्यानंतर नव्या व्यवहारांची सुरुवात करण्यात येत असते.

बँकांमधील ही काम तातडीनं उरकून घ्या...

तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ते काम तातडीनं पूर्ण करून घ्या. त्यानंतर त्यानंतर तुमच्या पॅनकार्डचा व्यवहारात कोणताही उपयोग होणार नाही. याशिवाय पंतप्रधान वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्च आहे. इतकंच नाही मार्च अखेरपर्यंत आयटीआर भरण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळं मार्च महिना संपण्याआधी तुम्ही बँकांमधील आवश्यक कामं पूर्ण करू शकता.

पुढील बातम्या