मराठी बातम्या  /  Business  /  Effect Of Rising Gold Price Now More Loan Will Be Available On Your Gold See Where Are The Interest Rates

Gold loan : सोने दर वाढीचा असाही परिणाम, सोने तारणावर मिळेल अधिक कर्ज, पहा व्याजदर

Gold loan HT
Gold loan HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Mar 22, 2023 11:10 AM IST

Gold loan : सोने दरातील तेजीमुळे सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. जर तुम्ही पहिल्या दराने कर्ज घेतले असेल तर तेंव्हाच्या एलटीव्ही अर्थात लोन टू व्हॅल्यूमध्ये आता फरक पडला असेल.

Gold loan : छोट्या अथवा व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोक प्रामुख्याने सोने तारण ठेवून कर्ज घेतात. यात तुमच्या जवळचे सोने विकण्याची गरज नसते. गेल्या एका महिन्यात अमेरिका आणि युरोपीयन बँकांमध्ये आलेल्या कर्ज संकटामुळे सोन्यात ७ ते ८ टक्के वाढ झाली आहे. या तेजीमुळे सोने तारण कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जर तुम्ही पहिल्यापासूनच स्वस्त दरात कर्ज घेतले असेल त्यावेळचे एलटीव्ही अर्थात लोन टू व्हॅल्यूमध्ये आता फरक झाला असेल. या वाढीव अंतरामुळे तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम वाढवू शकतात. मात्र इथे दर घटल्यानंतर बँक अथवा एनबीएफसी तुमच्याकडून पैसे परत मागू शकते.

सोने तारण कर्ज घेतल्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. क्रेडिट स्कोअर चांगला राखण्यासाठी वेळेवर कर्जाची परतफेड करावी लागेल. जर हप्ता फेडण्यास उशीर झाला तर डिफाॅल्टच्या ९० दिवसांच्या नंतर बँक सोने विकून पैसे परत घेऊ शकते.

एलटीव्हीचे गणित

जर तुम्ही ५७ हजार रुपयांच्या दराने सोने तारण कर्ज घेतले असेल तर नियमानुसार तुम्हाला ४५ हजार रुपयांचे कर्ज हातात आले असेल. आता किंमतीत ६० हजार रुपयांच्या घरात गेल्याने एलटीव्हीमध्येही वाढ होईल. याचाच अर्थ कर्ज रकमेच्या रुपयात तुम्हाला अधिक रक्कम मिळेल. कर्ज देणाऱ्या कंपन्या हे वाढीव मार्जिन पुन्हा मागू शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग