मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNB News : पंजाब नॅशनल बँकेनं दहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढवले एफडीचे व्याजदर

PNB News : पंजाब नॅशनल बँकेनं दहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढवले एफडीचे व्याजदर

Jan 11, 2024, 12:15 PM IST

  • Punjab National Bank FD Rates : पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात दहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढ केली आहे.

Punjab National Bank

Punjab National Bank FD Rates : पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात दहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढ केली आहे.

  • Punjab National Bank FD Rates : पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात दहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढ केली आहे.

PNB Fixed Deposit Rates : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेनं पुन्हा एकदा मुदत ठेवींच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे व्याजदर ८ जानेवारीपासून लागू होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

पंजाब नॅशनल बँकेनं अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्या व्याजदर वाढीची घोषणा केली आहे. याआधी देखील २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवरील एफडीच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारीपासून हे व्याजदर लागू झाले होते. त्यानंतर आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं पीएनबी बँकेच्या एफडीवरील सर्वाधिक व्याजदर ८.०५ टक्क्यांवर गेला आहे.

PPF Account : इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी पीपीएफ खातं महत्त्वाचं! कसं सुरू करायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

याआधी १ जानेवारी रोजी, बँकेनं काही कालावधीच्या एफडीवर ०.४५ टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढवले ​​होते आणि इतर मुदत ठेवींवरील दर कमी केले होते. आता बँकेनं ३०० दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवरील व्याजदर ६.२५ टक्क्यांवरून ७.०५ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ३.५ ते ७.२५ पर्यंत व्याज दिले जाते.

असे आहेत पीएनबी बँकेच्या एफडीवरील व्याजदर

७ ते १४ दिवस - ३.५० टक्के

१५ ते २९ दिवस - ३.५० टक्के

३० ते ४५ दिवस - ३.५० टक्के

४६ ते ६० दिवस - ४.५० टक्के

६१ ते ९० दिवस - ४.५० टक्के

९१ ते १७९ दिवस - ४.५० टक्के

१८० ते २७० दिवस - ६ टक्के 

२७१ ते २९९ दिवस - ६.२५ टक्के

३०० दिवस - ७.०५ टक्के

३०१ ते ३६४ दिवस - ६.२५ टक्के

१ वर्ष - ६.७५ टक्के

४०० दिवस - ७.२५%

४०१ दिवस ते २ वर्षे - ६.८० टक्के

२ वर्षांपेक्षा जास्त ते ३ वर्षे - ७ टक्के

३ वर्षांपेक्षा जास्त ते ५ वर्षे - ६.५० टक्के

५ वर्षांपेक्षा जास्त ते १० वर्षे - ६.५० टक्के

Mukesh Ambani : रिलायन्स ही कायम गुजरातचीच कंपनी राहील; मुकेश अंबानी यांचं वक्तव्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी

नव्या निर्णयामुसार, पीएनबी सात दिवस ते दहा वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ४ टक्के ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याजदर देणार आहे. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर ४.३ टक्के ते ८.०५ टक्क्यांपर्यंत असेल.

पुढील बातम्या